spot_img
अहमदनगरAhmednagar: केंद्रीय मंत्री गडकरी 'या' तारखेला नगर दौऱ्यावर! नेमका कार्यक्रम काय?

Ahmednagar: केंद्रीय मंत्री गडकरी ‘या’ तारखेला नगर दौऱ्यावर! नेमका कार्यक्रम काय?

spot_img

नगर मर्चंटस् को ऑप. बँकेचा सुवर्णमहोत्सव सोहळा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हस्तीमलजी मुनोत यांचा ‘सहकारयात्री’ उपाधीने गौरव

अहमदनगर। नगर सहयाद्री
येथील अहमदनगर मर्चंटस् को ऑप. बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा सोमवारी (दि. २६) दुपारी १.१५ वाजता केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. केशरगुलाब मंगल कार्यालयात होणार्‍या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार आहेत.

याच कार्यक्रमात सहकारी बँकिंग क्षेत्रातील ५६ वर्षांच्या योगदानाबद्दल बँकेचे संस्थापक तथा विद्यमान चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांचा सहकारयात्री उपाधीने गौरव करण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक अनिल पोखरणा यांनी दिली.

अनिल पोखरणा म्हणाले, अहमदनगर मर्चंटस् बँकेची ५० वर्षांची वाटचाल अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. हस्तीमलजी मुनोत यांनी आपल्या तत्कालिन सहकार्‍यांसह दूरदृष्टीने बँकेची मुहूर्तमेढ रोवली. शिस्तबध्द व काटकसरीने कारभार करून बँकेने व्यापार, व्यवसायाला पाठबळ देत अर्थकारणाला चालना देण्याचे काम केले आहे. बँकेचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना वर्षभर ग्राहक, सभासद, ठेवीदार, खातेदारांसाठी तसेच कर्मचार्‍यांसाठीही विविध कार्यक्रम घेण्यात आले.

आता या वर्षाची सांगता करताना चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांचाही मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सहकारयात्री उपाधीने गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेचे सौरभ राव, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. संग्राम जगताप, माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमात बँकेच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना भविष्यातील घोडदौडीचा वेध घेतला जाणार आहे. ५० वर्षांच्या वाटचालीत बँकेने अनेक माईलस्टोन गाठले आहेत. ‘मर्चंटस् बँक जिथे लक्ष्मी वास करे तिथे’ हा विश्वास आतापर्यंतच्या वाटचालीत बँकेशी निगडीत सर्व घटकांना आला आहे. हाच विश्वास कायम जपत भविष्यात आणखी मोठी भरारी घेण्याची जिद्द बँकेने ठेवली आहे.

या कार्यक्रमास सभासद, ग्राहक, खातेदार, ठेवीदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन व्हा. चेअरमन अमित मुथा, संचालक आनंदराम मुनोत, कमलेश भंडारी, संजय बोरा, किशोर गांधी, सीए आयपी अजय मुथा, सीए मोहन बरमेचा, संजय चोपडा, किशोर मुनोत, संजीव गांधी, प्रमिलाताई बोरा, मीनाताई मुनोत, विजय कोथिंबिरे, सुभाष भांड, सुभाष बायड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य राजेश झंवर, पेमराज बोथरा, सीए प्रवीण कटारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पुराणिक, जॉईंट सीईओ नितीन भंडारी, सेवक प्रतिनिधी प्रसाद गांधी, जितेंद्र बोरा आदींनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...