अहमदनगर। नगर सहयाद्री
सावेडीतील सोनानगर परिसरातील एका हॉटेल जवळील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या हुक्का पार्लर वर उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकला. या हुक्का पार्लरमध्ये तरुण हुक्का पिताना आढळले. पोलीस अंमलदार राजु जाधव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात हुक्का पार्लरच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त: सावेडी उपनगरात सोनानगर चौकात विराम हॉटेल शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये सुरू हुक्का पार्ल सुरू असल्याची माहित उपअधीक्षक भारती यांना मिळाली होती. त्यांनी सद ठिकाणी खात्री करून कारवा करण्याच्या सूचना पथकाल पथकाने बुधवारी (दि. २८) सायंकाळी छापा टाकला.
सय्यद अनिस युसुफ (वय २० रा. कबाड गल्ली, पंचपीर चावडी, माळीवाडा) व मालक ऋषीकेश सतीष हिंगे (रा. बोरूडे मळा, पंचशीलनगर, नगर) अशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद याला ताब्यात घेतले असून हिंगे पसार झाला आहे.
काचेचे पॉट, हुक्का पाइप, चिलीम तंबाखुजन्य पदार्थ असा सुमा १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार एस.टी. नेटके करीत आहेत.