spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग: संभाजी भिडे यांच्या गाडीवर हल्ला? कुठे घडला प्रकार

ब्रेकिंग: संभाजी भिडे यांच्या गाडीवर हल्ला? कुठे घडला प्रकार

spot_img

मनमाड। नगर सह्याद्री
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या गाडीवर तरुणांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वृत्त: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी गुरुवारी नाशिकच्या येवला तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्रीउशिरा ते कारने मनमाड मार्गे धुळ्याकडे निघाले असतांना त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. संभाजी भिडे मुर्दाबादच्या अशा घोषणा देत तरुणांनी त्यांची गाडी अडवली.

यावेळी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचवेळी आक्रमक झालेल्या काहींनी थेट भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आणि गाडी अडवणाऱ्यांना बाजूला केले. त्यानंतर संभाजी भिडे धुळ्याकडे रवाना झाले. भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनमाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Pineapple: ‘अशा’ पद्धतीने करा अननसाची शेती, एका हेक्टरमध्ये 30 टन उत्पादन? वाचा सविस्तर

नगर सहयाद्री वेब टीम- आता शेतीतील काळ बदलण्याची गरज आहे. राज्यातील शेतकरी आता विविध नाविन्यपूर्ण...

ऊफ ये गर्मी! हवामान विभागाची मोठी माहिती समोर..? ‘या’ भागात उष्णतेचा कहर

मुंबई । नगर सहयाद्री- एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून देशातील वातावरणात सातत्याने बदल पहावयास मिळत आहे. कुठं...

अहमदनगर: लाचलुचपत विभागाची धडक कारवाई! ‘पाटबंधारे’ विभागाचे दोन अधिकारी जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर । नगर सहयाद्री 'पाटबंधारे' विभागाचे दोन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.नगरच्या पाटबंधारे संशोधन...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी कसा असेल ‘शुक्रवार’?

मेष राशी भविष्य खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती...