पारनेर । नगर सहयाद्री:-
विधानसभेच्या उमेदवारीबाबत तालुक्यात सुरु असलेल्या चर्चांवर कुणीही विश्वास ठेऊ नये, आपण केलेल्या कष्टाची व आपल्या सर्वांच्या भावनांची प्रकर्षाने जाणीव असून पक्षश्रेष्टी पक्षहिताचाच निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाहीतआणि जर चुकून आपल्या सर्वांच्या भावनांची पायमल्ली करणारा निर्णय झाल्यास जे तुमच्या मनात..तेच माझ्या ध्यानात आहे. त्यामुळे कुणीही भावनाविवश होऊ नये वा खचून जावू नये असे विश्वनाथ कोरडे यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील जवळा येथे सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी विकासकामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष कृष्णाजी बडवे, खरेदी-विक्री संघ संचालक बाजीराव अलभर, जिल्हा कार्यकारणी सदस्य नवनाथ सालके, तालुका उपाध्यक्ष सोनालीताई सालके, ज्ञानदेव पठारे, संतोष सालके, गणेश देशमुख तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.