spot_img
महाराष्ट्रनेमकं काय घडतंय ! पोलिसांत गजा मारणे, बाबा बोडके, घायवळसह तीनशे गुन्हेगारांची...

नेमकं काय घडतंय ! पोलिसांत गजा मारणे, बाबा बोडके, घायवळसह तीनशे गुन्हेगारांची हजेरी

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : पुण्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या खूनांमुळे सध्या सर्वत्र घबराट पसरली आहे. शरद मोहोळ याची भरदिवसा हत्या झाल्याने खळबळ उडाली होती.

दरम्यान यामधून गॅंगवार भडकेल अशी चर्चा दबक्या आवाजात येत होती. परंतु त्याआधीच नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत करण्यात आलं आहे.

गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात हजेरी लावली आहे. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची आज ओळख परेड करण्यात आलीये. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते.

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी जवळपास दोनशे ते तीनशे गन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या आधी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांनी सर्व अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड केली. पुणे शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांवर ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे त्यांना सर्वांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आले होते.

पुणे शहरातील कायम चर्चेत असलेले गजानन मारणे, बाबा बोडके, जंगल्या सातपुते आणि निलेश घायवळ हे मोठे गुन्हेगार उपस्थित होते. यामधील काही गुन्हेगार हे जामिनावर बाहेर आहेत तर काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे अशा सर्वांना उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा वापर करू नये, अशा सूचना पोलिसांनी या गुंडांना दिल्या गेल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...