Maharashtra Crime News: बस स्थानकात परिसरात एक मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद देखील करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आणि धक्कादायक माहिती समोर आलीआहे.
मुलीला दारु पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा दाबून संपवलं?. संदीप शिरगावे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासर्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गडहिंग्लजवरुन कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत हा प्रकार घडला. मुलीला आणि नातवाला दारु पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा दाबून संपवलं.
नंतर सासू-सासऱ्याने जावयाचा मृतदेह कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात नेऊन ठेवला. सकाळी बस स्थानकाच्या परिसरात मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या हत्या प्रकरणाची उकल केली आहे.