spot_img
अहमदनगरविखे-शिंदे संघर्ष संपला! सागर बंगल्यावर नेमकं काय घडलं, काय म्हणाले आमदार शिंदे..?...

विखे-शिंदे संघर्ष संपला! सागर बंगल्यावर नेमकं काय घडलं, काय म्हणाले आमदार शिंदे..? पहा सविस्तर

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे व आ.राम शिंदे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे. मागील काही महिन्यांपासून विखे यांचा खुलेआम विरोध आ.शिंदे करत आहेत. परंतु याचा फटका लोकसभेला बसू शकतो हे विखे यांच्या ध्यानी आल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सागर बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

त्यानंतर आता रविवारी रात्री (दि.२४) आमदार राम शिंदे यांनी सागर बंगल्यावर धाव घेतली. या बैठकीत स्वतः खा. सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः होते. या दोघांमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यस्ती करत असून त्यांची ’चाणय’नीती फलद्रुप होईल का हे पाहणे औत्सुयाचे ठरेल. या बैठकीनंतर आ.राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना काही मुद्दे या बैठकीतील स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले आ. राम शिंदे
मागील अनेक वर्षांपासूनचे विषय या बैठकीत मांडले. लोकसभेच्या निवडणुकीला आम्हाला उभे राहायचे होते. परंतु नेतृत्वाने उमेदवारीबात दुसरा निर्णय घेतला. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य आहे. परंतु या बैठकीनंतर अडचणीचं निराकरण झालं असल्याचे आ. राम शिंदे यांनी यावेळी म्हणाले. तसेच माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली असून हे दुःख कोणीतरी समजून घेतल असून यातच समाधान आहे व अशा नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे असे शिंदे म्हणाले.

आ. राम शिंदे यांची नाराजी संपली?
नाराजगीबाबत शिंदे म्हणाले, पक्षीय पातळीवर वाद मिटले असून वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात तर उलट पक्षाने दिलेला आदेश मानून लढायचे असते. आजची बैठक यशस्वी झाली असून गळाभेट झाली नाही, मात्र हस्तांदोलन झालं आहे असाही सूचक वक्तव्य आ. राम शिंदे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...