spot_img
अहमदनगरडॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

spot_img

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी तुम्हाला!

मोरया रे…. / शिवाजी शिर्के
पाचपुतेदादांच्या गुलालात सदाअण्णाची मिळालेली साथ, साजनने घेतलेली भूमिका, विक्रम पाचपुतेंबद्दल बाप्पाने मांडलेल मत याबाबत मी आत्मचिंतन करत असतानाच मला राहून- राहून ‘कुतवळांची ऊर्जा’ं आठवत होती. बाप्पाला नेमकं काय म्हणायचं असेल याचा विचार मी करत राहिलो. रविवारी दिवसभर वाट पाहूनही बाप्पा भेटलाच नाही. केबीनच्या बाहेर कोणी आलं तरी बाप्पाच आलाय, असा भास दिवसभर व्हायचा! मात्र, रात्री उशिरापर्यंत बाप्पा भेटलाच नाही. नेहमीप्रमाणे सकाळी उठून जॉगिंगला निघालो. कॉलनीतून डाव्या बाजूला निघणार तोच समोरच्या कोपर्‍यावर बाप्पा दिसला! धावतच त्याच्या जवळ गेलो.

मी- बाप्पा कुठं गायब झाला होतास रे काल? मंगळवारी निरोप घेण्याआधी काल रविवारीच निरोप घेतला की काय असं वाटलं रे मला!

श्रीगणेशा- मला निरोप देण्याची खुपच घाई झालेली दिसतेय तुला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी दहा दिवसात निरोप घेणार नाही बरं का! मुक्काम वाढवलाय मी माझा. त्यामुळे तुला माझा कितीही कंटाळा आला असला तरी मी तळ ठोकून राहणार आहे आणि तुझ्याकडे दिवाळीचं फराळ खाऊनच जाणार आहे. (प्रश्नार्थक नजरेने मी त्याच्याकडे पाहत होतो. म्हणजे दिपावलीचं फराळ खाईपर्यंत, लक्ष्मीपुजन होईपर्यंत आपला पिच्छा सोडणार नाही याची मला खात्री पटली आणि काळजीही वाटू लागली!)

मी- बाप्पा, तुला कोण अडवणार इथे? तू ठरवशील तितक्या दिवसांचा तुझा मुक्काम! बाप्पा, परवाच्या भेटीत श्रीगोंद्याचा विषय बोलताना तू कुतवळांची ऊर्जा असं काही तरी बोलत होतास! काय आहे हा विषय? दोन दिवस झाले तरी तुझ्या डोक्यातून कुतवळ हा विषय तसाच आहे का? अरे काहीच नाही! प्रकाशशेठ आणि सतीशशेठ या दोघांच्या अथक प्रयत्नातून आणि बबनदादा- सदाअण्णा या दोघांच्या सहकार्यातून कुतवळ बंधूंचा ऊर्जा हा प्रकल्प सुरू झाला. दोघे कुतवळ बंधू आजही पाचपुतेंच्या सहकार्यानेच आम्ही उद्योगात यशस्वी झाल्याचे म्हणतात! मात्र, तमाम श्रीगोंदेकरांमध्ये चर्चा वेगळीच आहे! त्या चर्चेला काहीच अर्थ नाही. राजकारणाच्या पलिकडे जाऊन कुतवळ बंधूंनी आपल्या व्यवसायात लक्ष दिले. अर्थात मध्यंतरी या दोघा बंधूंमध्ये वैचारीक मतभेद झालेही! त्याला पडद्याआड कोण कारणीभूत याची वेगळी चर्चा! कृष्णाई हा ब्रँड कधीकाळी होता! त्याचं काय झालं हे मी सांगण्याची गरज नाही. मात्र, ‘ऊर्जा’ हा ब्रँड तयार झालाय आणि त्याला कारणीभूत ठरली ती व्यवसायाप्रती कुतवळ बंधूंची असणारी सचोटी! अरेबाबा, याहीपेक्षा अधिक महत्वाचे विषय आहेत. मला निरोप देण्यासाठी सारेच सज्ज झालेत! एक मात्र नक्की की, यावेळी माझ्या उत्सवाच्या निमित्ताने मोठं शक्ती प्रदर्शन झालं. डॉल्बीचा आवाज दणक्यात निघाला!

मी- बाप्पा, विषयांतर होतंय! श्रीगोंद्यातील राजकारणाचा विषय का बदलवत आहेस? खरंतर या तालुक्याचं राजकारण आता नेत्यांच्या सौभाग्यवतींभोवती फिरताना दिसू लागलंय! त्यावर तू काहीच का बोलत नाहीस? विकी- साजन यांच्या जोडीने प्रताप शर्यतीत! बरंच काही शिजतंय तिकडे श्रीगोंद्यात! तरीही तू त्यावर न बोलता विषयांतर करत आहेस!

श्रीगणेशा- त्यावर बोलणारच आहे. श्रीगोंद्यातील भानगडी खूप आहेत. वरकरणी जे दिसतंय ते तर अजिबात नाही! कोणकोणाच्या मांडीवर बसलंय आणि सख्खाचा त्याच्या सख्याची शिकार कशी करतोय हे तुला नक्कीच सांगणार आहे मी. तूर्तास दहा दिवसांच्या मुक्कामानंतर निरोपाची लगबग घराघरात आणि गल्लोगल्लीत चालू आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा जराशी टेंन्शनमध्ये दिसतेय!

मी- बाप्पा, पोलिसांनी त्यांच काम अचुक केल्याचं सध्यातरी दिसतंय! रात्री दहानंतर आवाज बंदच झाले. पोलिसांनी दंडुक्याचा धाक दाखवलाच!

श्रीगणेशा- सणवार, उत्सव आणि त्यात सारे रममान होत असताना बिच्चारे पोलिस आणि अधिकारी हे कायम टेंन्शनमध्ये! कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचा ताण त्यांच्यावर असतोच! आगमनाच्या दिवशी दणक्यात वाजणारे डॉल्बी, डीजे आणि लेसर लाईट्स निरोपाच्या मिरवणुकीतही वाजणारच! खरं तर हे डीजे रस्त्यावर येणार नाहीत याची काळजी पोलिसांनी आधीच घेण्याची गरज! निरोप घेण्याची वेळ आलीय! तुम्हा नगरकरांच्या डोळ्यावर जे झापडं बांधलंय ना ते कायमचं फेकून द्या! अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा! जे चुकीचं आहे त्याला विरोध करा! प्रशासनाच्या चुका तर थेटपणे मांडा! तुमच्यातील सहनशीलता त्यांच्या भ्रष्ट कारभाराला बळ देणारी ठरते! दहा दिवसांच्या माझ्या उत्सवात मी कितीही प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी जाब विचारण्याची कृती तुम्हाला करायची आहे!

मी- बाप्पा, निघण्याच्या वेळी आली तरी तू असले डोस पाजू लागलास! अरे, आम्ही दुबळे आहोत रे! वाईट गोष्टींचा प्रतिकार नाही करु शकत आम्ही!

श्रीगणेशा- छत्रपती जन्माला यावेत पण, शेजारच्या घरात असं काहीसं झालंय तुमचं सार्‍यांचं! सार्‍यांची टक्केवारीची दुकाने आहेत! लाल दिव्याच्या सत्ता बदलतात! कारभारी बदलतात! टक्केवारीची दुकाने बंद होत नाहीत! उलटपक्षी टक्केवारीचा टक्का वाढत चाललाय! अर्थात हे सारं फक्त तुमच्या नगरमध्येच आहे असं नाही! राज्यातही त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही!

मी- बाप्पा, निरोप द्यायला आम्ही सज्ज झालोत अन् तू हे काय सांगत आहेस?

श्रीगणेशा- निरोप द्यायला तुम्ही दरववर्षी सज्ज असतातच! पण, यावेळी मला डीजेबाबत आणि लेसर लाईटस बाबत पोलिस काय कारवाई करतात हे पहायचं आहे. आणि हो, मी ठरवलंय थेट पुढच्या वर्षीपर्यंत निरोप नाही घ्यायचा! इथल्या सार्‍या मंडळींवर मी वॉच ठेवण्याचा निर्णय घेतलाय अन् त्यानुसार

मी दिल्लीगेट मार्गे बाहेर पडल्यानंतर लागलीच माळीवाडा वेशीतून तुझ्या कार्यालयात येणार! नेमक्या मुद्यावर बोलण्याचा मी निर्णय घेतलाय!

मी- बाप्पा, बरं होईल रे! यानिमित्ताने तुझं दर्शन तरी होईल आम्हा सर्वांना!

श्रीगणेशा- चल निघतोय…. निरोपाची वेळ झालीय! अन् दुसर्‍या क्षणाला बाप्पा चालता झाला! ‘बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या’, असं म्हणणार तोच ‘पुढच्या वर्षी नव्हे, रोजच आपण भेटणार आहोत’, असं बाप्पानं दिलेलं उत्तर मला आठवलं! रोजच्या भेटीत बाप्पा कोणाचं वस्त्रहरण करणार याची उत्सुकता कायम ठेवत मी देखील माझ्या सहकार्‍यांसह त्याच्या आरतीची तयारी करू लागलो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Manoj Jarange Patil News : अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला...

तुमचे व्हॉट्सॲप कुठे कुठे आहे चालू? या युक्तीने कळेल क्षणार्धात

नगर सहयाद्री वेब टीम :- WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, जे प्रत्येकजण...

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होणार?

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा...

राज्याला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; रोहित पाटलांचा दणदणीत विजय

Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती...