spot_img
अहमदनगर10 वर्षे आमदार झोपा काढत होते का?, नेमकं कोण काय म्हणाल पहा...

10 वर्षे आमदार झोपा काढत होते का?, नेमकं कोण काय म्हणाल पहा…

spot_img

शेवगावचा पाणीप्रश्न सोडवण्यात हर्षदा काकडे यांना मोठे यश – प्रा. किसन माने; संघर्ष जनतेचा, उद्घाटन जनतेकडून आणि श्रेयही जनतेचेच; आमदारांचे नव्हे!
शेवगाव / नगर सह्याद्री –
शेवगावकरांच्या जिव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न फक्त सौ. हर्षदा काकडे यांनी नगरपालिकेसमोर केलेल्या महा मुक्काम ठोको आंदोलनामुळे यशस्वी झाला आहे. हा संघर्ष जनतेचा, उद्घाटन जनतेकडून आणि श्रेयही जनतेचेच आहे. त्यामुळे याचे श्रेय घेण्याचे काम आमदारांनी करू नये, असे प्रतिपादन प्रा. किसनराव माने यांनी शेवगाव येथे केले.

गुरुवार 03 ऑक्टोबर रोजी शेवगाव येथील स्वाी विवेकानंद कॉलनी कोरडे वस्ती, शेवगाव येथे शेवगाव शहर पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. किसनराव माने हे होते. तर यावेळी सौ. हर्षदा काकडे, विनोद मोहिते, सचिन आधाट, हरीश खरड, सुनील आव्हाड, वसुधा सावरकर, मंदाकिनी अकोलकर, नजमा पठाण, कल्पना धनवडे, सुनंदा धनवडे, निमाज शेख, रिजवाना शेख, हेमा हुशार, सोनाली हुशार, प्रतीक्षा नलवडे, शुभ्रा गरड, सातपुते नाणी, छाया बर्डे, ज्योती सांगडे, मनीषा फडके, सुनीता नागरे, सुजाता बडे, संगीता नागरे, विजय जोशी, प्रयागा गुळकर, जिजा मोडके, आशा मगर, कल्पना आघवणे, मनीषा विखे, चित्रा गरड, आशा म्हस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या अनेक वर्षांपासून शेवगावचा पाणीप्रश्न गंभीर स्वरूपाचा बनला आहे. त्यावर काकडे ताई यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच आज हा दिवस पाहायला मिळतोय. त्यांनी आंदोलन, पाठपुरावा केला नसता तर आजही पहिले पाढे पंचावन्न असते, असे प्रा. माने म्हणाले. आपल्या प्रश्नासाठी सौ. काकडे लढल्या व जिंकल्या आहेत. आता खूप लोक निवडणुकीपुरते तुमच्याकडे येतील पण आता शेवगावकरांनी एकच लक्षात घ्यायला हवे आपल्यासाठी लढले कोण? पाण्यासाठी धावून आले कोण? कोणाला गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण आहे? तर त्या आहेत फक्त सौ. हर्षदा व शिवाजीराव काकडे. म्हणून सौ.काकडे यांना आपण विधानसभेसाठी आपल्या घरातील व्यक्ती म्हणून निवडून दिले पाहिजे.

त्यांच्यासाठी आपल्या मतदार संघातील नातेवाईकांनीही त्यांचे प्रचारात खुलेआम उतरायला हवे. आपण यशस्वी होणार आहोत. आपल्याला आपला हक्काचा आमदार म्हणून सौ. हर्षदा काकडे यांना पाहायचे आहे. मी त्यांच्या वतीने सांगतो शहरातील प्रत्येक प्रश्न त्याच सोडू शकतात असेही माने म्हणाले.
यावेळी सौ. काकडे यांनी शेवगाव शहरात नागरिकांचे प्रश्न घेत असताना सर्व प्रभागांतून फक्त पाणी प्रश्नावर ताई काहीतरी करा अशी मोठी मागणी नागरिकांनी केल्याचे सांगितले. कारण 15-20 दिवसांतून एकदा शहराला पाणी येते. म्हणूनच मी या विषयावर सर्व कागदपत्रे काढून शहरातील महिलांचे मोठे आंदोलन नगरपालिकेसमोर केले. 2017 सालापासून या योजनेसाठी शासनाचे पैसे येऊन पडले होते; परंतु त्यावेळी कंत्राटदारासोबत तडजोडी झाल्या नाहीत. कंत्राटदाराने योग्य कागदपत्रांची पूर्तता केली नाही असे सांगून त्यांच्यावर केसेस दाखल करून ते टेंडर रद्द करण्यात आले. त्यानंतर कृती समितीने या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून पुन्हा टेंडर करण्यास भाग पाडले व आता या योजनेसाठी 72 कोटी 50 लाख रुपये पाणी योजनेसाठी निधी मंजूर झाला. हे यश फक्त सर्व महिला व शेवगावकरांचे आहे. आता आमदार उद्घाटनाला येतील. त्यावेळी त्यांना सांगा हा संघर्ष जनतेचा, उद्घाटन जनतेकडून आणि श्रेयही जनतेचेच आहे. त्यामुळे आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असेही सौ. काकडे म्हणाल्या.

यावेळी सौ. मीराबाई व बबनराव लव्हाट, आशाबाई व अशोकराव बोडखे, सौ. अनिताताई व चंद्रकांत वावरे, सौ. केशरबाई व दादासाहेब म्हस्के, सौ. गंगुबाई व आसारा बोडखे या जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड यांनी केले. अरुण वावरे यांनी आभार मानले.

10 वर्षे आमदार झोपा काढत होत्या काय?
विद्यमान लोकप्रतिनिधींनी शेवगाव शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाणी मिळण्यासाठी इतके वर्षे वंचित ठेवून मोठे पाप केले आहे. 10 वर्षे आमदार असूनही त्यांना हा प्रश्न दिसला नाही काय? त्या काय झोपा काढत होत्या का? आता उगाच फुकटचे श्रेय त्यांनी घेऊ नये व डबल उद्घाटनासाठी येऊन अपान करून घेऊ नये. – सौ. मंदाकिनी अकोलकर, (सदस्या, शेवगाव शहर नागरिक कृती समिती).

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...