spot_img
ब्रेकिंगWeather Update: 'कडक' थंडी सोबत 'मुसळधार'! राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अलर्ट

Weather Update: ‘कडक’ थंडी सोबत ‘मुसळधार’! राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा अलर्ट

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसू शकतो. चक्रीवादळाचा परिणाम अजूनही कायम असून देशातील तामिळनाडू, केरळ-माहे या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत असतानाच राज्यातील काही भागांत कडक थंडीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमीदाबाचा पट्टा तयार झाल्याने मिचाँग चक्रीवादळ तयार झालं आहे. देशातील काही भागांत थंडी वाढू लागली आहे. हवामान विभागाने आज देशात अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी केलाय. पुढील काही दिवस राज्यासह देशातील काही भागांत गारापीट, मुसळधार पाऊसची शक्यता आहे.

चक्रीवादळाचा इफेक्ट राज्यात आणखी काही दिवस कायम राहणार आहे. थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये देखील थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईत गुलाबी थंडी जाणवत असून काही उपनगरांमध्ये पारा घसरताना दिसतोय. कर्जत, खोपोली तसेच बदलापूर या ठिकाणी पहाटेच्यावेळी कडाक्याची थंडी जाणवत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस देशातील काही राज्यांत अवकाळी पाऊस होईल. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, लक्षद्वीप या राज्यात विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे. काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...