spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking: कॅफे शॉपच्या 'चॉकलेटी' पडद्याआड 'काळा' कारभार

Ahmadnagar Breaking: कॅफे शॉपच्या ‘चॉकलेटी’ पडद्याआड ‘काळा’ कारभार

spot_img

‘कोल्ड’ कॉफी शॉप चालकांना ‘तोफखाना’ पोलिसांचा ‘हॉट’ चटका

अहमदनगर। नगर सहयाद्री-

शहरात कॅफे शॉपच्या नावावर अनोखा कारभार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅफे शॉपच्या प्लायवूडच्या कंपार्टमेंटमध्ये काळे पडदे लावून मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या प्रकरणी चालकांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅफें शॉपमध्ये मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्याची माहिती तोफखाना ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिसांच्या पथकाने कारवाई सुरु केली.

बालिकाश्रम रोडवरील डाऊन कॅफे, पारिजात चौकातील हंगरेला कॅफे, प्रेमदान चौकातील तारा पानशेजारील द व्हेनी कॅफे, पंपिंग स्टेशन रोड, ताठेनगर वनस्टार कॅफे येथे तीन बाय तीन लांबीचे व सुमारे पाच फूट उंचीचे प्लायवूडचे कंपार्टमेंट्स, त्याला बाहेरच्या बाजूने पडदे बसवलेले आढळून आले.

कारवाई दरम्यान काही मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळले. त्यांना समज देत सोडून देण्यात आले असून फरहान शेख (रा. केडगाव), शक्ती सिंग (भिमा सकर, राजस्थान), विशाल पालवे (कोल्हार, पाथर्डी), रंजीज पंडित (इंदिरानगर, पुणे) व ओंकार ताठे (ताठेनगर, सावेडी) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...