spot_img
राजकारण'आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा', रोहित पवारांचा...

‘आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा’, रोहित पवारांचा घणाघात

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : अलीकडील काळात राज्यात विविध परीक्षांमधील गैरकारभार समोर आला. नुकताच तलाठी भरतीचा महाघोटाळा चर्चेत असून बुधवारी पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला. सारथी, बार्टी, महाज्योतीतर्फे आयोजित परीक्षेत पुन्हा घोळ झाल्याचे समोर आले आहे. यावरून आ.रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? या शब्दात घणाघात केला आहे.

रोहित पवार यांनी पी.एचडी फेलोशिपसाठी पेपर फुटल्यासंदर्भात जोरदार टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तलाठी भरतीतील गैरप्रकार ताजा असतानाच काल पुन्हा सारथी, बार्टी आणि महाज्योतीमार्फत पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचाही पेपर फुटला.

आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा, ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी पुढे म्हटले की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी मुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय. त्यामुळं पेपरफुटीवर कडक कायदा करा. युवकांनी ही मागणी किती वेळा करायची? युवकांना जेव्हा तुम्ही सिरीयस होण्याचा सल्ला देतात तेव्हा आपल्या जबाबदारीबाबत आपण सिरीयस होणार की नाही?

रोहित पवार यांनी तलाठी भरती आणि सर्व भरतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. भाजप सरकारमध्ये हेच सुरू आहे. कोणी लक्ष देत नाही. हा मुद्दा मुलांनीच पुढे आणला आहे. या प्रकरणी आम्ही चौकशीची मागणी करत आहोत. परंतु विखे पाटील यांनी आमच्यावर काही कारवाई करायची असेल तर करा, असे आव्हान त्यांनी दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...