spot_img
राजकारणआमच ठरलं ! १३ खासदार पुन्हा लढणार, शिंदेंच्या 'या' शिलेदाराचा गौप्यस्फोट

आमच ठरलं ! १३ खासदार पुन्हा लढणार, शिंदेंच्या ‘या’ शिलेदाराचा गौप्यस्फोट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी व महायुती अशी लढत होईल असेच चित्र आहे. महायुतीमध्ये जागा वाटप कसे होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच आता शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचीही चर्चा रंगत असताना रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तयारीला लागण्याचे आदेश दिले असून शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत असं म्हटलं आहे.

लोकसभेच्या जागावाटपावर बोलताना खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, “आमचे १३ खासदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. या सर्व उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

माझ्या निवडणूक तयारीविषयी सांगायचं झाल्यास, माझ्या मतदारसंघातील ५८ सर्कलमध्ये ५८ मेडिकल कॅम्प घेण्यात येणार आहेत. आज चौथा मेडिकल कॅम्प झाला असून फेब्रुवारीपर्यंत ५८ मेडिकल कॅम्प पूर्ण करणार आहोत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...