spot_img
राजकारणआमच ठरलं ! १३ खासदार पुन्हा लढणार, शिंदेंच्या 'या' शिलेदाराचा गौप्यस्फोट

आमच ठरलं ! १३ खासदार पुन्हा लढणार, शिंदेंच्या ‘या’ शिलेदाराचा गौप्यस्फोट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी व महायुती अशी लढत होईल असेच चित्र आहे. महायुतीमध्ये जागा वाटप कसे होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच आता शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचीही चर्चा रंगत असताना रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तयारीला लागण्याचे आदेश दिले असून शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत असं म्हटलं आहे.

लोकसभेच्या जागावाटपावर बोलताना खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, “आमचे १३ खासदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. या सर्व उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

माझ्या निवडणूक तयारीविषयी सांगायचं झाल्यास, माझ्या मतदारसंघातील ५८ सर्कलमध्ये ५८ मेडिकल कॅम्प घेण्यात येणार आहेत. आज चौथा मेडिकल कॅम्प झाला असून फेब्रुवारीपर्यंत ५८ मेडिकल कॅम्प पूर्ण करणार आहोत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून...

शहर हादरवून सोडणारी संतापजनक घटना! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेसमोर सपासप वार

Maharashtra Crime News: नागपूर शहर हादरवून सोडणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, १६...

पावसाचा जोरदार कमबॅक: राज्यातील ‘या’ १२ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई । नगर सहयाद्री:- काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं असून, मुंबईसह...

भीषण अपघात! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले, कुठे घडली घटना?

Accident News: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ आज सकाळी आठच्या सुमारास झालेल्या...