spot_img
अहमदनगरअहमदनगर जिल्ह्यात पाण्याचा ठणठणात! सहा लाख नागरिक भागवतायेत 'ईतक्या' टँकरच्या पाण्याने तहान

अहमदनगर जिल्ह्यात पाण्याचा ठणठणात! सहा लाख नागरिक भागवतायेत ‘ईतक्या’ टँकरच्या पाण्याने तहान

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर विभागातील पाणीटंचाईची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे पाणीटंचाईच्या विळख्यात सापडली आहेत. प्रशासनातर्फे ३१२ टँकरने २९१ गावे व १५४४ वाडी-वस्तीवरील ५ लाख ७० हजार लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे.

अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघात निवडणुका पार पडल्या. यामध्ये प्रशासन, नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्तेही बिझी होते. त्यामुळे अनेकांना पाणी टंचाईकडे लक्ष द्यायला वेळच पुरला नही.परंतु आता ही निवडणूक संपल्याने तहानलेल्या लोकांना पाणीपुरवठा करण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात ३१२ टँकरने २९१ गावे व १५४४ वाडी-वस्तीवरील ५ लाख ७० हजार लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त होते. परंतु आता निवडणुका संपल्याने पाणीटंचाईला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यातच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे काही ठिकाणी सुरू असल्याने पंचनामे करण्यासाठी तारेवरची कसरत प्रशासनाला करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात टँकरच्या मागणीला सुरुवात झाली.

अर्थात टँकरची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास फेब्रुवारी महिना उजाडला. त्यानंतर खर्‍या अर्थाने टँकरमध्ये वाढ होऊ लागली. आज अखेर जिल्ह्यात ३१२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाणीटंचाईची तीव्रता पाथर्डी तालुक्यात असून निम्म्याहून अधिक तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्या या तालुक्यात ८३ गावे ४२९ वाड्यांवरील तब्बल १ लाख ६६ हजार ९९२ लोकांना ९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. तसाच पाणीपुरवठा आता शहरी भागात म्हणजे नगरपालिका हद्दीमध्ये देखील करावा लागत आहे. सध्या पाथर्डी, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा व शेवगाव या पाच नगरपालिका हद्दीत २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...