spot_img
देशPM Narendra Modi Property: PM नरेंद्र मोदींच्या संपत्तीत किती झाली वाढ? कुठे...

PM Narendra Modi Property: PM नरेंद्र मोदींच्या संपत्तीत किती झाली वाढ? कुठे केली गुंतवणूक, पहा एका क्लिकवर..

spot_img

PM Modi Property: पीएम मोदींनी यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सुमारे अर्धा डझन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाराणसीतून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपूर्ण संपत्तीचा तपशील दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांची एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच 2019 च्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी एकूण संपत्ती 2 कोटी 51 लाख रुपये असल्याचे घोषित केले होते. 2014 च्या निवडणुकीत मोदींनी आपली संपत्ती 1 कोटी 65 लाख दाखवली होती. 10 वर्षात पंतप्रधानांच्या संपत्तीत अंदाजे 1 कोटी 37 लाख 6 हजार 889  रुपयांनी वाढ झाली आहे.

बँक खात्यात 80 हजार रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सांगितले की, सध्या त्यांच्याकडे जवळपास 52,920 रुपये रोख आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत 73,304 रुपये आणि वाराणसी शाखेत 7000 रुपये उपलब्ध आहेत.

2.85 कोटींची मुदत ठेव
पीएम नरेंद्र मोदी यांच्या नावावर स्टेट बँक (SBI) मध्ये 2.85 कोटी रुपयांची FD देखील आहे. याशिवाय त्यांच्याकडे 9,12,398 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देखील आहे.

पीएम मोदींकडे 4 सोन्याच्या अंगठ्या
पीएम मोदींनी त्यांच्या शपथपत्रात सांगितले की, त्यांच्याकडे एकूण 45 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्याची किंमत जवळपास 2.67 लाख रुपये आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...