spot_img
अहमदनगरनगरकरांवर जलसंकट! शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार, नेमकं कारण काय? पहा..

नगरकरांवर जलसंकट! शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार, नेमकं कारण काय? पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरात बुधवारी (२० मार्च) पाणी पुरवठा बंद असणार आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील पंपहाउस, सबस्टेशन व मुख्यजलवाहिनी इत्यादी ठिकाणची महत्वाची दुरुस्ती कामासाठी अहमदनगर महानगरपालिकेकडून बुधवारी सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यत शट डाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी एक दिवस विलंबाने मिळणार आहे.

बुधवारी विविध कामामुळे होणार्‍या शटडाऊन मुळे बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहररोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच बुरूडगाव रोड, सारस नगर, कोठी, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर आदी भागास पाणीपुरवठा होउ शकणार नाही. हा पाणीपुरवठा गुरूवार (दि.२१) रोजी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

तसेच गुरूवार (दि.२१) रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्राखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळु बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हाडको, टि.व्ही सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, विनायक नगर, आगरकर मळा, स्टेशन रोड, कायनेटीक चौक परिसर इ. भागात महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणीपुरवठा हा गुरूवार ऐवजी शुक्रवार (दि.२२) रोजी करण्यात येईल.

शुक्रवारी होणार्‍या सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, आनंदीबाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सारसनगर, बुरुडगांव रोड व सावेडी इत्यादी भागातील पाणीपुरवठा होणार नसून तो शनिवार दि.२३ रोजी करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...