spot_img
अहमदनगर'तारकपुर' बस स्थानकांसमोर करणार होता विक्री.? पोलिसांना कुणकुण लागताच नेवाश्याचा 'विशाल' अडकला...

‘तारकपुर’ बस स्थानकांसमोर करणार होता विक्री.? पोलिसांना कुणकुण लागताच नेवाश्याचा ‘विशाल’ अडकला जाळ्यात, नेमकं प्रकरण काय..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणाला तोफखाना पोलिसांनी तारकपूर स्थानकांसमोर पकडले. विशाल पांडुरंग बोरूडे (वय २५, रा. वारूळाचा मारूती, नालेगाव, मूळ रा. वाघवाडी, लोहगाव, ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तारकपूर बस स्थानकाबाहेर रस्त्यावर एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी तारकपूर बस स्थानकाबाहेरील बाजूला सापळा लावला.

काही वेळातच रस्त्याच्या बाजूस आलेल्या एका तरुणाची हालचाल संशयास्पद असल्याने सदर तरुणाला ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव विशाल पांडुरंग बोरूडे असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...