spot_img
देशVirat Kohli News : विराट कोहली टी २०, वन डे पासून दूर;...

Virat Kohli News : विराट कोहली टी २०, वन डे पासून दूर; नेमकं काय म्हणाला विराट…

spot_img

दक्षिण आफ्रिका दौर्‍यात फक्त कसोटीसाठी उपलब्ध
Virat Kohli News : नवी दिल्ली | वृत्तसंस्था – रन मशीन असलेल्या विराट कोहलीने [Virat Kohli News]   दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळण्यास नकार दिला आहे. त्याने बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिल्याचे वृत्त आहे. कोहली पांढर्‍या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती घेईल आणि फक्त कसोटी क्रिकेटसाठी उपस्थित असेल, असे सांगण्यात येते.

विराट कोहलीने बीसीसीआयला पांढर्‍या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याची माहिती दिली आहे. तो केवळ कसोटी क्रिकेटमध्ये उपलब्ध असेल. भारतीय संघाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका दौरा आहे. तेथे तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळणार आहे. या दौर्‍याची सुरुवात १० डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार आहे. त्यानंतर १७ डिसेंबरपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल आणि त्यानंतर २६ डिसेंबरपासून टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.

कोहलीने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना सांगितले, की त्याला पांढर्‍या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांतीची गरज आहे. जेव्हा त्याला पांढर्‍या चेंडूचे क्रिकेट खेळावे वाटेल तेव्हा तो परत येईल. सध्या तो लाल बॉल क्रिकेट खेळणार आहे, म्हणजेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपस्थित राहणार आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर...

राणीताई लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; महायुतीत एकमत होईना

तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता गणेश जगदाळे | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. पारनेर...

पवारांच्या नातवाकडून कर्जत-जामखेडकरांचा भ्रमनिरास; रोहित पवारांविरोधात तरुणाई देखील एकवटली

साधा माणूस म्हणून राम शिंदेंचा मार्ग झाला अधिक सुकर कर्जत | नगर सह्याद्री पवारांचा नातू म्हणून...

जागावाटपाआधीच आघाडीत बिघाडी; काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा अर्ज…

मुंबई / नगर सह्याद्री - महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. कोणती...