spot_img
अहमदनगरलोढा हाईट्सबाबत विक्रम राठोड यांचा मोठा खुलासा; 'त्याचा आमचा' काहीच संबंध नाही

लोढा हाईट्सबाबत विक्रम राठोड यांचा मोठा खुलासा; ‘त्याचा आमचा’ काहीच संबंध नाही

spot_img

अर्बन बँकेच्या विद्यमान संचालकांना ‘आयुर्वेद’कडूनच अभय | शीतल आस्वादशी आमचा काहीच संबंध नाही
अहमदनगर | नगर सह्याद्री
चितळे रस्त्यावरील लोढा हाईटसची जागा ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची होती. तिथे आमचे राठोड कुटुंबीय त्या तोरडमल यांच्या वाड्यात आजी- आजोबापासून स्वत:च्या मालकीच्या जागेत राहत होते. नंतर तो वाडा पाडून ती जागा विकसीत करण्यात आली. त्याच जागेवर लोढा हाईटस ही इमारत बांधण्यात आली. त्यामुळे आमचा देखील त्या जागेवर कायद्याने अधिकार असल्याचा खुलासा शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव तथा जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

लोढा हाईटसवरील ताबेमारीच्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत स्पष्टपणे इन्कार करणारे पत्रक विक्रम राठोड यांनी प्रसिद्धीस दिले आहे. लोढा हाईटस व त्याशेजारी आमच्या मालकीच्या जागेवर स्व. अनिल राठोड यांनी स्वखर्चाने इमारत बांधली असून त्या इमारतीस मिळालेली बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र स्व. अनिल राठोड यांनीच घेतले असल्याचे व त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.लोढा हाईटस्वरील मोबाईल टावर गेल्या सात वर्षांपासून बंद असून त्या टॉवरचे भाडे लोढा हाईटसच् या सोसायटी खात्यात जमा होत होते. ते राठोड यांना मिळण्याचा प्रश्नच नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. शीतल आस्वादशी आमचा काहीच संबंध नाही. शीतल आस्वाद चा मालक कोण, त्याचा ताबा अधिकृत की अनधिकृत याच्याशी राठोड कुटुंबाचा काहीच संबंध नाही.

नगर शहरात गोरगरीब जनता आणि व्यापारी यांच्यावर गुंडगीरी करुन ताबे मारण्यात कोण पटाईत आहे नगरकरांना माहिती आहे. स्व. अनिल राठोड यांनी सदर गुंडांच्या ताब्यात असलेेले अनेक भुखंड रिकामे करुन जनतेला न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्याच कार्याचा वारसा मी चालवत असून त्यातूनच मी जनतेच्या मनावर ताबा मिळवला असल्याचेही राठोड यांनी पत्रकात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...