spot_img
अहमदनगरविक्रम पाचपुते यांचे मोठे विधान; विजयाचे खरे कारण सांगितले...

विक्रम पाचपुते यांचे मोठे विधान; विजयाचे खरे कारण सांगितले…

spot_img

नगर तालुक्यातील प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात ज्या ज्या वेळी बहुरंगी लढत झाली त्या त्या वेळी पाचपुतेच निवडणूक आले आहेत. हा आजपर्यंत इतिहास आहे. आता होत असलेल्या निवडणुकीमध्येही श्रीगोंदा-नगर मतदारसंघात बहरंगी लढत होत आहे. त्यामुळे माझा विजय पक्का असल्याचे सांगत विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नाही. आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जात आहोत. नगर तालुक्याने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना जशी साथ दिली तशीच साथ मलाही द्यावी, नगर तालुक्याच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही असे आश्वासन महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी दिले.

महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी प्रचारार्थ नगर तालुक्यातील साकत, वाळूंज, रुईछत्तीशी येथे दौरा केला. यावेळी ते बोलत होते. दौऱ्यामध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी विक्रम पाचपुते म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळेल असे वाटले नव्हते. आम्ही दादांसाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होतो. परंतू, उमेदवारी आईला मिळाली. पहिल्याच यादीत नाव जाहीर झाले. दादा आजारी असल्याने संपूर्ण मतदारसंघात आईला फिरणे शक्य नव्हते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार शेवटच्या क्षणी माझी उमेदवारी झाली.

माजी मंत्री बबनराव पाचपुते आमदार, मंत्री राहिले आहेत. त्यांनी श्रीगोंदा मतदारसंघाचा विकास केला. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक निधी श्रीगोंदा मतदारसंघात आणला आहे.
दादांनी विकासाचे व्हिजन घेऊन काम केले. परंतू, आता विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. केवळ पाचपुते परिवाराकडून होत असलेला श्रीगोंद्याचा विकास रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. परंतू, श्रीगोंद्यात आत्तापर्यंत झालेल्या बहुरंगी लढतीत पाचुतेच विजयी झाले आहेत हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नाही. आपल्याकडे व्हिजन आहे. 143 गावांचा संपूर्ण अभ्यास केलाय. निधी कसा आणायचा हे माहित आहे. मतदारसंघाची विकासासाकडे वाटचाल सुरु आहे. त्यात खंड पडू देऊ नका असे सांगत मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा आपल्या विश्वासाला तडा जावू देणार नसल्याचे विक्रम पाचपुते यांनी सांगितले.
यावेळी सरपंच मकरंद हिंगे, उपसरपंच लखन दरेकर, पंकज पाडळे, अमोल गायकवाड, अनिल मोरे, सुमित रोहकले, बाळासाहेब दरेकर, रोहीदास शेळमकर, हनुमंत काकडे, कुंडलिक दरेकर, मयुर दरेकर, बापु हिंगे, रोहीदास पाडळे, राजू कर्डिले, जगन्नाथ हिंगे, मच्छिंद्र दरेकर, संतोष गायकवाड, ऋषभ गादिया, मच्छिंद्र दरेकर, संजय हिंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय राऊत यांचे वक्तव्य बालिश पणाचे ः विक्रम पाचपुते
गेल्या दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात येऊन आमदार बबनराव पाचपुते यांच्या आजारपणाबद्दल वक्तव्य केले. त्याबद्दल महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांना विचारले असता संजय राऊत यांचे वक्तव्य बालिशपणाचे असल्याचा टोला पाचपुते यांनी राऊतांना लगावला. यावेळी नागवडे यांचाही खरपूस समाचार घेतला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वांबोरीचा कारखाना सहकारी केल्यास मी पाठींबा द्यायला तयार ; कर्डिले यांचे रोखठोक मुलाखतीत तनपुरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र

छत्रपती शिवरायांचं नाव हातोड्याने तोडून आजोबाचं नाव दिलं! तो कारखाना बंद पाडून बापाच्या नावानं...

विजयाची फुले पवारांना अर्पण करणार ः प्रणोती जगताप

राहुल जगताप यांच्यासाठी काष्टीत प्रचारफेरी श्रीगोंदा | नगर सह्याद्री महाविकास आघाडीच्या तिकिटाचे दावेदार राहुल जगताप हेच...

घराणेशाहीवर टीका करणार्‍यांची घरात पद घेण्यासाठी धडपड; दातेंची लंकेंवर टीका, काय म्हणाले पहा…

देवीभोयरे परिसरात प्रचारफेरी पारनेर | नगर सह्याद्री - राजकारण, समाजकारणात सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असून, पारनेर विधानसभा...

सेटलमेंट झाली की ते माघार घेतील अन् एकाला पाठींबा देतील!; विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत

श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांची विरोधकांना धोबीपछाड देणारी सडेतोड मुलाखत...