spot_img
अहमदनगरलंकेंच्या निवडीला विखेंकडून आव्हान; खा. लंके म्हणाले त्यांना खेळच करायचा असेल तर...

लंकेंच्या निवडीला विखेंकडून आव्हान; खा. लंके म्हणाले त्यांना खेळच करायचा असेल तर करू द्या मीही…

spot_img

औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल | निवडणुकीतील खर्च, प्रचारातील मुद्दे यासह विविध बाबींचा याचिकेत समावेश

छत्रपती संभाजीनगर | नगर सह्याद्री

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. नीलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

डॉ.सुजय विखे पाटील यांनी अ‍ॅड.आश्विन होन यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची बदनामी करणारी आहेत. तसेच नीलेश लंकेंनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्षातील खर्च यांचा ताळमेळ नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही. परिणामी लंके यांनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातल्या मर्यादेचे उल्लंघन झालेले, आदी मुद्यांवर सुजय विखे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएममवर शंका घेऊन भाजपचे पराभूत उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएममची तपासणी करण्याची मागणी केली आहे. यावरून त्यांच्यावर टीका करताना खासदार निलेश लंके यांनी ईव्हीएम आणि निवडणूक यंत्रणेवर विश्वास व्यक्त केला आहे. ही पडताळणी कशी करायची यासंबंधी आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानंतर खासदार लंके यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, लंके म्हणाले, वास्तविक ईव्हीएममबाबत आम्ही तक्रार करायला हवी होती. मात्र, ज्यांचे देशात सरकार आहे, त्यांनीच ही तक्रार केली आहे. विखे कोणाशीच प्रामाणिक नाहीत. त्यांचा यंत्रणेवरही विश्वास नाही. माझा निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर शंभर टक्के विश्वास आहे. या यंत्रणेमध्ये फेरफार, बदल होत नाही. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक आहे. या यंत्रणा मॅनेज होत असत्या, तर उमेदवारांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केले नसते. फक्त मशिन मॅनेजफ केले असते असेही लंके म्हणाले.

त्यांना खेळच करायचा असेल तर करू
द्या मीही जिगरबाज खेळाडू ः खा. लंके
भाजपाचे पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटांचे विजयी उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडील उच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. यावर खासदार नीलेश लंके यांनी भाष्य केले आहे. ते सध्या खेळ खेळायाचा प्रयत्न करत आहे. आपणही जिगरबाज खेळाडू आहोत, त्यांना खेळच करायचा असेल करू द्या, आपणही व्यवस्थितपणे खेळू. निवडणूकीत जे झाले ते कोर्टातही होईल असे सांगत सुजय विखे पाटील यांना खासदार नीलेश लंके यांनी जोरदार टोला लगावला आहे.

डॉ.सुजय विखे पाटील यांनी अ‍ॅड.आश्विन होन यांच्यामार्फत दाखल औरगांबाद उच्च न्यायालयात याचिक दाखल केली आहे. यात निवडणूकीतील प्रचार, निवडणूकीतील खर्चांतील तफावत यावर आक्षेप घेण्यात आले. सदर याचिका न्यायालयात दाखल करून घेतली आहे. या सर्व प्रकरणांवर खासदार नीलेश लंके यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, संसदीय लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून लोक आपला प्रतिनिधी निवडत असतात. या प्रक्रियेत कुणाचा तरी पराभव झाला, होणार हे निश्चित आहे. पण आपण आपला पराभवच होऊ शकत नाही अशी मानसिकता बाळगणे ही हुकुमशाही प्रवृत्ती असल्याची टीका लंके यांनी केली आहे.

आपल्या समोरचे पराभूत उमेदवार कधी निवडणूक आयोग तर कधी हायकोर्टात जाताना दिसत आहेत. अर्थात हे त्यांना कायद्याने उपलब्ध करुन दिलेले मार्ग आहेत. या मार्ग तपासून जर त्यांना मनःशांती लाभत असेल तर त्यांना जे काय करायचं करु द्या. आपली बाजू सत्याची आहे आणि सत्यमेव जयते म्हणजे अखेर विजय सत्याचाच होतो हे ते कदाचित विसरलेले असावेत, असा टोलाही त्यांनी लागवला आहे.
ते सध्या खेळ खेळायचा प्रयत्न करत आहेत. पण आपणही जिगरबाज खेळाडू आहोत. निवडणूक झाली, विरोध संपला. विधायक मार्गाने आपण सर्वजण जनहितासाठी पुढे जाऊ हि आपली भूमिका आहे. पण त्यांना खेळच करायचा असेल तर आपणही व्यवस्थितपणे खेळू. निवडणुकीत हरवलेलं आहेच, कोर्टातही तेच होईल, असेही खा.लंके म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सातव्या मजल्यावरून कोसळला कामगार; जागीच मृत्यू, अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील कल्पवृक्ष सोसायटीमध्ये सुरू असलेल्या इमारत बांधकामादरम्यान...

सासुरवाडीने काढला जावयाचा काटा! घरगुती वादात कुऱ्हाडीने वार नंतर…

Maharashtra Crime : कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेसंबंधातील...

आजचे राशी भविष्य! दोन राशींसाठी आजचा दिवस लाभदायक… वाचा तुमच्या राशीत आज काय?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका - अन्यथा...

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....