spot_img
ब्रेकिंगविखे पाटलांचा पवारांवर हल्लाबोल; जनाची नाही तर मनाची...

विखे पाटलांचा पवारांवर हल्लाबोल; जनाची नाही तर मनाची…

spot_img

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुनावले | शरद पवारांवर हल्लाबोल

धाराशिव | नगर सह्याद्री
साखर कारखान्यांच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इथेनॉल धोरणाला आहे. मात्र, साखर संघाच्या सभेत आणि अहवालात या नेत्यांचे फोटो किंवा अभिनंदनाचा ठराव नसल्याबद्दल जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ज्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी साखर कारखानदारीला जीवनदान दिलं, त्यांचे फोटो बॅनरवर लावले जात नाहीत, किंवा सभेत त्यांचं अभिनंदन केलं जात नाही. अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, असं मंत्री विखे पाटील यांनी तिखट शब्दांत सुनावले. यावेळी अजित पवार त्या काळात मंत्रिमंडळात नव्हते, असंही त्यांनी नमूद केले.

जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धाराशिव येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

साखर कारखान्यांच्या इथेनॉल धोरणावर बोलताना विखे पाटील यांनी अजित पवारांना जनाची नाही तर मनाची ठेवा असा टोमणा मारला, तर शरद पवार यांना जाणता राजा म्हणत त्यांनी लोकांच्या घरात फोडाफोडी करून महाराष्ट्र उपाशी ठेवला असा गंभीर आरोप केला. या वक्तवाने महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शरद पवार यांना जाणता राजा म्हणत विखे पाटील यांनी त्यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनी फोडाफोडीचं राजकारण करत लोकांची घरं फोडली आणि महाराष्ट्राला उपाशी ठेवण्याचं पाप केले, असा थेट आरोप त्यांनी केला. साखर कारखान्यांच्या धोरणावर बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकारी चळवळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विखे पाटील यांनी साखर कारखानदारीच्या प्रगतीचं श्रेय केंद्र सरकारच्या धोरणांना देताना, शरद पवार यांच्या योगदानाला कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. दरम्यान, विखे पाटील यांच्या या वक्तवाने महायुतीतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. यापूर्वीही विखे पाटील आणि अजित पवार यांच्यात दूध अनुदानाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळात खटके उडाले होते. २३ सप्टेंबर २०२४ रोजी दूध उत्पादकांना ५ ऐवजी ७ रुपये अनुदान देण्याच्या मुद्द्यावर दोघांमध्ये तू-तू, मैं-मैं झालं होतं. आता पुन्हा विखे पाटील यांच्या या टोमण्याने अजित पवार गट आणि भाजपमधील तणाव वाढण्याची शयता आहे. साखर कारखान्यांचा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे, आणि यावरून होणारा वाद महायुतीच्या एकजुटीवर परिणाम करू शकतो.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मैत्री महागात पडली; तरुणीवर अत्याचार, केडगावमधील युवकाचा प्रताप, वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावरील ओळखीतून मैत्री आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून एका...

‘सिस्पे’च्या आरोपींमध्ये केंद्रस्थानी ‘अण्णा’?; सुजय विखे कोणत्याही क्षणी भांडाफोड करण्याच्या तयारीत

सारिपाट / शिवाजी शिर्के जादा परताव्याचे अमिष दाखवून नगर शहरासह पारनेर, श्रीगोंदा तालुका आणि...

माजी आमदार नंदकुमार झावरे पुन्हा विखे पाटलांच्या व्यासपीठावर, राजकीय चर्चांना उधाण!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पारनेरच्या राजकारणात निर्णायक भूमिका घेत निलेश लंके यांना आमदार करण्यासह त्यांना...

अहिल्यानगर हादरले! भाड्याच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळली तरुणी, जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचे भयंकर कृत्य

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शहरातील सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरात एका भाड्याच्या खोलीत महाविद्यालयीन युवतीवर...