spot_img
ब्रेकिंगRavindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त असल्यामुळे महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान मागील दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयायातून घरी सोडण्यात आले होते. अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि अखेर वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.

रविंद्र बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ३०० पेशा जास्त मराठी सिनेमामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे गाजलेले मराठी चित्रपट

आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाई चा भाऊ यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...