spot_img
अहमदनगर"मुंजोबा तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात विविध उपक्रम"

“मुंजोबा तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात विविध उपक्रम”

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील वडगाव सावताळ येथे गणेश उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत. गावातील मुंजोबा तरुण मित्र मंडळ दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करत आहे. या मित्र मंडळाच्या माध्यमातून गावात विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. उत्सव काळामध्ये मित्र मंडळाच्या वतीने परिसरामध्ये आकर्षक सजावट व लाईट डेकोरेशन करण्यात आले आहे.

त्यामुळे परिसरात गणपती उत्सव हा आकर्षण बनला आहे. अनेक गणेश भक्त येथे दर्शनासाठी येत आहेत. गणेश स्थापनेच्या दिवशी गावचे सरपंच संजय रोकडे व अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गणेश मित्र मंडळाला व आरतीला गावचे माजी सरपंच राजेंद्र रोकडे, उद्योजक अशोक खराबी, मोहनराव रोकडे, इंजि. निखिल दाते, माऊली ठुबे, सर्जेराव रोकडे, प्रसिद्ध गाडामालक तुकाराम झावरे, उद्योजक भगवान वाळुंज, मंगेश खामकर, विपो फाउंडेशनचे अध्यक्ष मनोजभैय्या झावरे, निलेश शिंदे, संदीप व्यवहारे आदी प्रमुख उपस्थित राहिले.

यावेळी मुंजोबा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल गायकवाड, उद्योजक सतीश गायकवाड, बाळासाहेब नरवडे भागवत गायकवाड बाबाजी गायकवाड शुभम आंधळे संतोष आंधळे संजय केदारी स्वप्निल गायकवाड दादाभाऊ गायकवाड किरण गायकवाड शरद कुंभार संजय केदारी संतोष खोसे प्रतीक लोळगे आदेश साळवे राजेंद्र क्षीरसागर भरत शिर्के पवन शिर्के देवानंद क्षीरसागर वामन रोकडे वेदांत ठुबे रोशन भोसले प्रशांत आंबेकर शिवराम ठुबे ग्रामपंचायत सदस्या सीमाताई गायकवाड, वंदना गायकवाड, ऋतुजा गायकवाड, दिपाली जांभळकर, मनीषा कुंभार, लताबाई आंधळे, आदी विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतात.

विविध धार्मिक कार्यक्रम..
वडगाव सावताळ येथे मुंजोबा तरुण मित्र मंडळ च्या माध्यमातून नियमित दरवर्षी विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात गावातील इतरही सामाजिक उपक्रमांमध्ये मित्र मंडळाचा सहभाग असतो. गणेश उत्सव काळात मंडळाच्या वतीने भेदिक भजन प्रवचन महिलांसाठी व लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करत असतो. गणेशोत्सव काळात दररोज महाप्रसाद असतो अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड व – – अनिल गायकवाड यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...