spot_img
ब्रेकिंगमहायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला?; अजित दादांनी किती जागा मागितल्या पहा...

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला?; अजित दादांनी किती जागा मागितल्या पहा…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय नेत्यांनी सभा, मेळावे आणि आढावा बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा आणि विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. यातच मागील काही दिवसांपासून कोणता पक्ष किती जागा लढवणार? महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? यावर वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती जागा मिळणार? तसेच शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आता अजित पवार यांनी महायुतीमध्ये किती जागा मागितल्या आहेत? याचा खुलासा आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीमध्ये ८० ते ९० जागा मागितल्या आहेत”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

“आमचे जे कारभारी आहेत, मग त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे हे विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करत असतात. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपासंदर्भातील चर्चा कुठपर्यंत आली हे त्यांना माहिती असतं. मी त्या चर्चांमध्ये जास्त लक्ष घालत नाही. त्यांनीही मला जास्त काही सांगितलं नाही. पण मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीमध्ये ८० ते ९० जागा मागितल्या आहेत. त्यावर किती निकाल येतो? याची मला कल्पना नाही”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “मला महायुतीमधील तिन्ही नेत्यांचं कौतुक करायचं आहे. काही दिवसांपासून चर्चा आहेत की हा पक्ष १८० जागा लढवणार, तो पक्ष ८० जागा लढवणार, पण आता असं ठरलं आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही आकड्यावर जायचं नाही. आता असं ठरलं आहे की, फक्त जिंकण्यासाठी लढायचं आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिंकेल, त्या ठिकाणी त्यांचा आग्रह आम्ही मान्य करणार, तसेच ज्या जागांवर शिवसेना शिंदे गट जिंकेल त्या जागांवर आम्ही त्यांचा आग्रह मान्य करणार, तसेच ज्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी जिंकेल, त्या ठिकाणी आमचा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मान्य करतील. हाच महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे”, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....