spot_img
अहमदनगरसामाजिक कार्यात 'कन्हैया अॅग्रोचे मोलाचे योगदान : नगराध्यक्ष नितीन अडसूळ

सामाजिक कार्यात ‘कन्हैया अॅग्रोचे मोलाचे योगदान : नगराध्यक्ष नितीन अडसूळ

spot_img

रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पारनेर / नगर सह्याद्री :

Parner news : एखादा व्यवसाय उभा राहताना समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांची मोठी मदत होते. व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत आसते. हे करीत आसताना सामाजिक कामात योगदान देणे आवश्यक असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्याची जोड देत “कन्हैया अॅग्रो” ची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनी केले.

गटेवाडी (ता. पारनेर) येथे कन्हैया उद्योग समूह, एचडीएफसी बैंक, जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याचे उदघाटन नगराध्यक्ष अडसूळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कन्हैया अॅग्रोचे कार्यकारी संचालक सुरेश पठारे, संचालक मच्छिंद्र लंके, संचालक अभय औटी, लिवेश नायर, विठ्ठल पवार, मार्केटिंग हेड श्रीपती भट, कार्यकारी व्यवस्थापक राजस घोगरे, डॉ. झेंडे, श्री अनंत व कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

अडसूळ म्हणाले, रक्तदान हे जीवनदान देण्यासाठी आवश्यक आहे. रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही. सशक्त माणूस रक्तदान करू शकतो. यावेळी ६१ नागरिकांनी रक्तदान केले.

रक्तदान ही आजच्या काळाची गरज
एकाने रक्तदान केल्यास त्यातून चौघांना जीवनदान मिळते. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. समाजात रक्तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करून रक्तदान वाढवणे ही आजच्या काळाची गरज आहे.
– सुरेश पठारे, कन्हैया अॅग्रो कार्यकारी संचालक,

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...