spot_img
अहमदनगरजिल्ह्याच्या विकासाबाबत खासदार सुजय विखे यांचे महत्वाचे विधान, म्हणाले जिल्हा आता...

जिल्ह्याच्या विकासाबाबत खासदार सुजय विखे यांचे महत्वाचे विधान, म्हणाले जिल्हा आता…

spot_img

श्रीगोंदा तालुक्यामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार सुजय विखे, विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत संपन्न…

श्रीगोंदा / नगर सह्याद्री – Ahmednagar news आपला गावचा विकास कसा होईल व जास्त निधी आपल्या गावासाठी कसा मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो आपण योग्य सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो, व आपल्या गावासाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रामाणिक प्रयत्न करत असतो असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले

कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व साखर वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संदीप नागवडे, बाळासाहेब नलगे, दिनकर पंदरकर, बाळासाहेब गिरमकर, अजित जामदार, संतोष लगड, अमित लगड, अकील इनामदार, लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड तसेच सैनिक संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार विखे यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून कोळगाव मध्ये 33 कोटी रुपयांची विकास कामे होत आहेत. आपण विकासाला प्राधान्य द्याल तर आपल्या मुलांचे उज्वल भविष्य घडेल. नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत दहा वर्ष मागे होता पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नगर जिल्हा विकास कामाच्या बाबतीत पाच वर्ष पुढे नेऊन ठेवला असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रस्त्यांचे काम आज नगर जिल्ह्यात झाले असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
साकळाई योजने संदर्भात अनेक वर्ष राजकारण झालं, अनेकांची भाषणे झाली मात्र आमदार पाचपुते, कर्डिले साहेब व माझ्या माध्यमातून साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन 794 कोटी रुपयाची येत्या जानेवारी महिन्यात प्रशासकीय मान्यता घेऊन लवकरच तेही काम पूर्ण होईल अशी ग्वाही यावेळी ग्रामस्थांना दिली

यावेळी बोलताना विक्रमसिंह पाचपुते म्हणाले गावच्या विकासामध्ये भर पडायचे असेल तर रस्ते झाले पाहिजे रस्ते झाल्याने दळणवळण वाढते व गावच्या विकासाला प्रारंभ होतो येथे तीन ते चार महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याचे स्वरूप बदलून जाईल व विकास होत असताना गावकऱ्यांचा हातभार लागल्याने विकासामध्ये अधिक भर पडते खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी साखर वाटपाचा अभिनव उपक्रम केला असल्याचे बोलत खा.विखे यांचे अभिनंदन केले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अजितदादांना धक्का!; नागवडेंच्या हाती मशाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा मतदारसंघांमध्ये अनेक राजकीय उलटफेर होत आहेत. काही...

सहा खात्याच्या राज्यमंत्रीपदातून वाडा भरवला; आ. प्राजक्त तनपुरेंच्या विरोधात राहुरीकरांची पश्चातापाची भावना

राहुरी | नगर सह्याद्री:- कोणताही जनसंपर्क नसताना फक्त तनपुरेंच्या घरात जन्म आणि मामाची फिल्डींग यातून...

संदीप कोतकर थांबणार? दोन दिवसात भूमिका जाहीर करणार!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहर विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत माजी महापौर संदीप कोतकर हेच...

भाजप पक्षश्रेष्ठींना यश! कोल्हे यांची निवडणुकीतून माघार? ‘ती’ पोस्ट चर्चत; “कुछ पल के अंधेरे का अंत…”

कोपरगाव । नगर सहयाद्री:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारीसाठी आर्ज दाखल करण्यासाठी...