spot_img
अहमदनगरजिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगणेशोत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ या कालावधीत लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर लागू राहतील. हे आदेश ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी प्रभावी असतील.

जिल्ह्यातील मिरवणुकांमध्ये काही मंडळांकडून लेझर लाईट, दबाव हॉर्न (प्रेशर मिड) व कार्बन डायऑक्साइड वायूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या वापरामुळे मिरवणूक बघण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

विशेषतः अशा साधनांच्या वापरामुळे मानवी श्वसन संस्थेला हानी पोहोचणे, हृदयाचे ठोके वाढणे, कानाच्या पडद्यांवर तसेच लहान मुलांच्या डोळ्यांवर बरे न होणारे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. परिणामी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...

पोटदुखीवर मुख्यमंत्री उपाय करतील! राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले, ‘यांचे’ वक्तव्य चर्चेत..

मुंबई | नगर सहयाद्री मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा...