spot_img
अहमदनगरअर्बन बँक प्रकरण: सीए मर्दा विरोधात ‘लुक आऊट’

अर्बन बँक प्रकरण: सीए मर्दा विरोधात ‘लुक आऊट’

spot_img

अहमदनगर। नगर सह्याद्री-
बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यातील संशयित आरोपी सीए विजयकुमार मर्दा पसार झाला आहे. तो परदेशात पळून जाण्याची शयता असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी केली आहे.

नगर अर्बन बँकेतील सुमारे २९१ कोटींच्या घोटाळ्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. अटक केलेले मुख्य कर्ज तपासणी अधिकारी मनोज वसंतलाल फिरोदिया व कर्जदार प्रवीण सुरेश लहारे सध्या पोलीस कोठडीत आहे.

अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणात विजयकुमार मर्दा याला अटक केली होती. त्या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आहे. त्याचा अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणात सहभाग असतानाही त्याला वर्ग करून न घेतल्याचा आक्षेप बँक बचाव समिती व ठेवीदारांनी न्यायालयात घेतला होता. याबाबत म्हणणे मांडताना सीए मर्दा याच्या शोधासाठी ‘लूक आऊट’ नोटीस काढत असल्याचे तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी न्यायालयात सांगितले होते.

सीए मर्दाची ‘लूक आउट’ प्रस्ताव ब्युरो ऑफ इमिग्रेशन, गृह मंत्रालय भारत सरकार, दिल्ली येथे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने मर्दा विरोधात ‘लूक आउट’ नोटीस जारी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...