spot_img
अहमदनगर‘अर्बन’ बँक प्रकरण! पुन्हा एका कर्जदाराला अटक, 'असा' केला होता घोटाळा..

‘अर्बन’ बँक प्रकरण! पुन्हा एका कर्जदाराला अटक, ‘असा’ केला होता घोटाळा..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर अर्बन बँके प्रकरणात एक नवी अपडेट समोर आली आहे. 291 कोटींच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका कर्जदाराला अटक केली आहे. अक्षय राजेंद्र लुणावत (वय 34, रा. उंड्री, पुणे) असे या कर्जदाराचे नाव आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पुण्यातील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, न्यायालयाने त्याला 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी: अक्षय लुणावत हा कल्पद्रुमा ज्वेलर्सचा संचालक असून त्याच्या नावावर आठ कोटी रूपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. त्याने बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व संचालक यांच्याशी संगनमत करून कल्पद्रुमा ज्वेल्स अ‍ॅण्ड जेम्स या कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण मालमत्तेचे वाढीव मुल्यांकन दर्शवून वेळोवेळी मोठ्या रकमांचे कर्ज घेतले. या कर्ज रकमेचा गैरवापर केला व कर्ज रकमेची परतफेड केलेली नाही.

या कर्ज रकमेच्या वापराबाबत तपास करून रक्कम हस्तगत करायची आहे. लुणावत याने सन 2015 मध्ये घेतलेल्या सहा कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेडकरण्यासाठी नगर अर्बन बँकेचे कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नोलॉजी या फर्मच्या नावाने मंजुर कर्जाची रक्कम वापरण्यात आली आहे. टेरासॉफ्ट टेक्नोलॉजीच्या खात्यातून तीन कोटी 5 लाख रूपये माऊली ट्रेडर्स यांच्या मर्चंटस् बँकेतील खात्यात वर्ग केली व तेथून रोख स्वरूपात काढून ती रक्कम नगर अर्बन बँकेत जमा करून त्याव्दारे त्याचे कर्ज निरंक केल्याचे दर्शवलेले आहे.

तसेच, लुणावत याच्या खात्यातून नगर अर्बन बँकेचे संचालक नवनीत सुरपुरीया, डॉ. निलेश शेळके व इतरांच्या खात्यावर वेळोवेळी रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत. या रकमा बनावट कागदपत्राच्या आधारे घेतलेल्या कर्जापोटी त्याने संचालकांना दिल्या असण्याची शक्यता आहे. याचा तपास करण्यासाठी 7 दिवस पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विना परवाना रस्ता खोदणे पडले महागात’; महापालिकेची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री चितळे रस्त्यावर भराड गल्ली येथे महिनाभरापूव नव्याने करण्यात आलेला काँक्रिटचा रस्ता...

रवींद्र धंगेकर पुण्यातील वाल्मिक कराड! काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप..

पुणे | नगर सह्याद्री काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर रामराम करत रविंद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये...

जीवाचा थरकाप उडवणारा प्रकार! सात मिनिटांमध्ये सिलिंडरचा स्फोट, नेमकं काय घडलं?

Maharashtra News: छत्रपती संभाजीनगर शहरातील देवळाई परिसरातल्या एका फॅब्रिकेशनच्या दुकानात लोखंड कापताना ठिणग्या उडाल्याने...

बाबांची शिर्डी पुन्हा हादरली! पोटच्या पोराने बापाचा काटा काढला?

शिर्डी । नगर सहयाद्री:- महिनाभरापूर्वी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना भोसकत संपवल्यानंतर दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण...