नगर सह्याद्री टीम : तुम्हाला कार विकत घ्यायची आहे का? जे तुम्ही कमी बजेटमध्ये सबकॉम्पॅक्ट कार खरेदी करण्याचा विचहर करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला 2024 मध्ये लॉन्च होणार्या 4 कारबद्दल माहिती देणार आहोत. या चारही कार 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या आहेत. Upcoming Cars
KIA SONET FACELIFT
Kia जानेवारी 2024 मध्ये आपली सोनेट फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. या छोट्या एसयूव्हीच्या किमती जानेवारीमध्ये जाहीर केल्या जातील. परंतु, त्याची किंमत सुमारे 8 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तथापि, मिड-लेव्हल आणि हाय-स्पेक व्हेरियंटची किंमत 10 लाख रुपयांच्या असपास असेल.
NEW MARUTI SWIFT
मारुती सुझुकी 2024 च्या पहिल्या तिमाहीत नवीन जनरेशन स्विफ्ट लॉन्च करणार आहे. हे कार हेविली रिवाइज्ड HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नवीन मॉडेलमध्ये काही डिझाइन बदल आणि नवीन इंटीरियर मिळू शकते. याची सुरुवातीची किंमत 6.5 लाख ते 7 लाख रुपये असू शकते.
NEW MARUTI DZIRE
मारुती सुझुकी स्विफ्टसोबतच नवीन जनरेशनची डिझायर सब-4 मीटर सेडान लाँच करण्याच्या तयारीत आहे. 2024 च्या मध्यापर्यंत ते विक्रीसाठी उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. नवीन मारुती डिझायर डिझाइनमधील बदल आणि इंटीरियर लवकरच सांगेल. या कारची प्रारंभिक किंमत 6.5 लाख ते 7 लाख रुपये असू शकते.
TATA ALTROZ FACELIFT
टाटा मोटर्स 2024 मध्ये Altroz हॅचबॅक फेसलिफ्ट लॉन्च करू शकते. नवीन मॉडेलमध्ये नवीन इंटिरियरसह, नवीन डिझाइन असेल. यात मोठी 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असेल. या कारची प्रारंभिक किंमत 10 लाख रुपयांच्या आत असेल.