spot_img
देशWeather Update: अवकाळी पाऊस अन हुडहुडी!! पिकांसह आरोग्यावर होणार परिणाम?

Weather Update: अवकाळी पाऊस अन हुडहुडी!! पिकांसह आरोग्यावर होणार परिणाम?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
अवकाळी पावसाने मंगळवारी शहरासह जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावल्याने सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दिवसभर पाऊस व वातावरणात गारवा होता. मान्सूननंतरही तब्बल १४ दिवस नगर शहर व जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नोव्हेंबरमध्ये ९ दिवस, डिसेंबरमध्ये ३ दिवस, जानेवारीत २ दिवस अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे पिकांचे नुकसान तर झालेच पण वातावरणाने आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे.

मंगळवारी (दि. ९) दिवसभर थंड वार्‍याबरोबर अवकाळी पाऊस होता. रिमझिम पावसाने घराबाहेर पडणेही टाळले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पावसाचा कमी अधिक जोर होता. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभरा पिकांवर झाला. आरोग्यावर देखील या वातावरणाचे विपरित परिणाम होत आहेत. थंडी, ताप या बरोबरच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा सुरू झाला असून, अशा वातावरणात वृद्ध, लहान मुले, इतर आजार असणार्‍यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. सर्दी, खोकला याचे प्रमाण जास्त असल्यास वेळीच तपासणी करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.

आणखी ढगाळ राहणार
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने नगर जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शयता वर्तवली आहे. पुढील ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात हलया स्वरूपाचा पाऊस पडेल, असाही अंदाज वर्तवला आहे.

मावा, करपाची भिती
सध्याच्या अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे पिकांसह मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. सर्दी, खोकला आदीसारखे आजार वाढले आहेत. गव्हाच्या पिकावर मावा पडण्याची शयता आहे. हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव, कांदा पिकावर करपा रोगाचा परिणाम होण्याची शयता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...