spot_img
ब्रेकिंगकेंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही वाढतात. भाजपकडे भरपूर पीक आहेत, जे चांगले उत्पादन देतात, परंतु काही रोग देखील आणतात. त्यामुळे अशा आजारी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, असे बेधडक वक्तव्य पुन्हा एकदा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या 11 दिवस आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बंडखोरांबाबत वक्तव्य केले आहे. गडकरींना शनिवारी एका मुलाखतीत बंडखोर भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत विचारण्यात आले होते. त्याला उत्तर देताना गडकरी पुढे म्हणाले, भाजपमध्ये नवीन लोक वेगवेगळ्या कारणांसाठी येत आहेत. त्यांना प्रशिक्षण देणे, विचारधारा सांगणे आणि त्यांना कार्यकर्ता बनवणे ही आपली जबाबदारी आहे. हजार कार्यकर्ते उभे असतात, पण कधी कधी एक कार्यकर्ता काहीतरी बोलतो आणि त्या हजार कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरते.

गडकरींना विचारण्यात आले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवानंतर नड्डा आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या अनेक बैठका घेतल्या, परंतु ते या बैठकांना उपस्थित नव्हते. त्यावर गडकरी म्हणाले- महाराष्ट्रात माझी कोणतीही भूमिका नाही. येथील नेते सक्षम आहेत. जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी उपलब्ध असेल.

काँग्रेसने ग्रामीण भारताचा विचार केला नाही
गडकरी पुढे मुलाखतीत म्हणाले की, सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्ष असो वा नसो, पण राज्य, सरकार आणि प्रशासन हे धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. काँग्रेसने ग्रामीण भारताच्या विकासाचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. ग्रामीण भारताला प्राधान्य दिले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या आणि खेड्यात गरिबी नसती. भारताच्या 75 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने ग्रामीण भागाच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना...

नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगर पंचायतीसाठी १० नोव्हेंबर पासून...

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...