spot_img
ब्रेकिंगPolitics News: नाशिकमध्ये मराठा समाज कुणाला देणार साथ? पत्रकार परिषदेत समाजाचा एकमुखी...

Politics News: नाशिकमध्ये मराठा समाज कुणाला देणार साथ? पत्रकार परिषदेत समाजाचा एकमुखी निर्णय, वाचा सविस्तर

spot_img

नाशिक । नगर सहयाद्री
लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्‍यावर येत आहेत. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो आणि प्रचारसभा होणार आहे. मात्र या सभेच्या आधीच महायुतीला मोठा धक्का बसला असून मराठा समाजाकडून नाशिकसह दिंडोरी लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहेनाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर अन्याय करणार्‍या, मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा न देणार्‍यांना पाडण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांना पाठिंबा देत असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण द्या; मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टीमेटम, थेट तारीखच सांगितली

मुंबई / नगर सह्याद्री - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला थेट...

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट; पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांना पावसाने झोडपलं

पुणे / नगर सह्याद्री : राज्यभरातील थंडी आता गायब झाल्याचं चित्र आहे. अनेक जिल्ह्यांत...

तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गूढ उकलले, धक्कादायक कारण आलं समोर

परभणी / नगर सह्याद्री - परभणीच्या गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या...

महागाईपासून दिलासा नाहीच! रेपो रेट जैसे थे, EMI वर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - (RBI REPO Rate) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या...