spot_img
अहमदनगरदुर्दैवी! दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, कुठे घडली घटना?

दुर्दैवी! दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, कुठे घडली घटना?

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री
तालुक्यात श्रीराम नवमीचा उत्सव साजरा होत असतानाच दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली आहे. रितेश सारंगधर पावसे (वय १२) व प्रणव सारंगधर पावसे (वय ८) अशी मृत्यू झालेल्या भावंडाची नावे आहे.

अधिक माहिती अशी: दोघे ही भाऊ हिवरगाव पावसा येथील शाळेत शिक्षण घेत होते. मोठा रितेश हा इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत होता तर लहान प्रणव हा इयत्ता 3 री मध्ये प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. वडिलांचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाल्याने वडिलांचे छत्र हरपले होते. त्यामुळे, आई फार कष्टाने शेती करून आपला उदरनिर्वाह करत मुलांचा सांभाळ करत होती.

बुधवार दि. १७ एप्रिल रोजी रामनवमी असल्याने मुलांना शाळेला सुट्टी होती. त्यामुळे, ते दुपारी जेवण करून घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते. खेळत- खेळत ते शेततळ्याच्या शेजारी आले. खेळता- खेळता दोघेही शेततळ्यात पडले. शेततळ्यात पाणी मोठ्याप्रमाणात असल्याने त्यांना ठाव लागला नाही. दोघांनी आपल्या प्रयत्नांना पूर्णविराम दिला. दरम्यान काही काळानंतर हा प्रकार मळ्यातील लोकांनी पाहिल्यानतंर उघडकीस आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...