spot_img
अहमदनगरजिल्ह्यात 'अवकाळी' पासवसाचा तडाखा! वर्षंभर काबाड कष्ट करून घेतलेली सर्जा-राजाची बैल जोडही...

जिल्ह्यात ‘अवकाळी’ पासवसाचा तडाखा! वर्षंभर काबाड कष्ट करून घेतलेली सर्जा-राजाची बैल जोडही हेरली..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
जिल्ह्यात काल पुन्हा एकदा अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे फळबागांसह शेतीचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. वर्षंभर काबाड कष्ट करून घेतली बैल जोडही आवकाळी पावसाने बळीराजाच्या हातून हेरली आहे.

जामखेड तालुक्यात चार जनावरे मृत्यूमुखी
जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा सुरू आहे. काल सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या अवकाळी व विजेच्या कडकडाटास पाऊस सुरू झाला यात वीज पडून तालुक्यात दोन गायी एक बैल एक वासरू मृत्यूमुखी पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पांडुरंग वराट यांचा बैलाचा वीज पडून मृत्यू झाला. तसेच वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील कुसडगाव येथील बिभीषण रामचंद्र भोरे यांची गाय, जवळके येथील अंकुश वाळुंजकर यांची गाय, दादासाहेब हाडोळे यांचा बैल तर भुतवडा येथील उद्धव पांडुरंग डोके यांचे एक वासरू वीज पडून मृत्यू पावले आहे.

पारनेर तालुक्यात वीज पडून बैल जोडीचा मृत्यू
परिसरात काल, बुधवारी (दि. १७) दुपारी वीज पडून दोन बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान पिंपरी गवळी परिसरात वादळी वाऱ्यासह विजाचा कडकडाट चालू असताना पिंपरी गवळी येथील शेतकरी कैलास कुंडलिक मांडगे यांची बैलजोडी शेतात लिंबाच्या झाडाला बांधलेली होती. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मांडगे यांना बैलजोडी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता आली नाही. काही वेळातच विजेचा कडकडाट होऊन बैल बांधलेल्या ठिकाणी वीज कोसळली. मोठा आवाज झाल्याने मांडगे यांनी बैल बांधलेल्या ठिकाणी धाव घेतली तर दोन्ही बैल वीज पडल्याने मृत झाले होते.

रुईछत्रपतीचे तीन शेतमजूर गंभीर
रुईछत्रपती शिवारातील शेतमजूर संदीप हरिभाऊ भुताबरे ( वय २४ वर्षं, रा. ढवळपुरी ता. पारनेर ), अशोक हेमा पारदे ( वय २५ वर्षं, रा. ढवळपुरी ता. पारनेर ), महेश नारायण जाधव ( वय २२ वर्षं, रा. चिंचाळे ता. राहुरी ) हे तीन शेतमजुर बुधवारी दुपारी वादळ वारा सुटल्याने शेतातील वृक्षाच्या आडोशाला बसले होते. त्यावेळी त्यातील एकाचा फोन चालू होता. वादळ वारा व विजांचा कडकडाट चालू असतानाच या मजुराचाही फोन चालू असल्याने विजेचा प्रवाह जोराचा तेथुन गेला व या तिघांनाही जोराचा झटका बसला. यावेळी एकाच्या मोबाईलचा स्पोट झाला.त्यावेळी पाच दहा मिनिटे त्यांना काही कळाले नाही. त्यांचे हात पाय चोळल्यानंतर ते सावध झाले. त्यातील एकाला छातीला भाजले एकाच्या पायाला भाजले व एकाचे थोडे केस जळाले असून त्यांना नगर येथील सिव्हिलला दाखल केले असुन त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...