spot_img
महाराष्ट्रउद्धव ठाकरेंचा २०२४ मध्ये प्रभाव वाढणार, ‘ही’ माणसं करू शकतात घात !...

उद्धव ठाकरेंचा २०२४ मध्ये प्रभाव वाढणार, ‘ही’ माणसं करू शकतात घात ! ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी..

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री : १९ जून १९६६ ला बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी या त्या काळातील उमद्या शिलेदारांना घेऊन शिवसेना या पक्षाची स्थापना केली. शिवसेना शाखा ते थेट मंत्रालय असा प्रवास साध्या शिवसैनिकांनी केला. पण सत्तेच्या राजकारणात मात्र शिवसेनेत बंड झालं. दरम्यान शिवसेनेबाबत ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी केली आहे.

शिवसेनेचा जन्मच मुळात अमावास्येचा, त्यातही रवीचंद्र ग्रहणयोग पंचमी स्थानी असताना तसेच पराक्रमाचा स्वामी दशमेश मंगळ चतुर्थात राहूसह एकत्र असल्याने शिवसेनेचा प्रवास ज्वलंत, निर्भिड व गनिमी काव्याने शत्रूचे नामोहरम करण्याने सुरु झाला. मंगळ, राहू, शनी अशा खडतर महादशांमधून प्रवास केल्यावर आता पक्षाच्या कुंडलीत बुधाची महादशा सुरु होत आहे. या महादशेत निश्चितच शिवसेनेचा प्रभाव पूर्ववत होऊन पुन्हा नव्या जोमाने वाटचाल सुरु होईल. साधारण जून २०२४ मध्येच या साऱ्या गोष्टी दिसू लागतील असे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत नवमात मंगळ, षष्टात केतू, दशमात बुध व लाभ स्थानात रवी हे ग्रह राजकीय स्थितीसाठी अत्यंत मदतीचे ठरतील. चतुर्थात स्वराशीतील गुरु व दशमातील मिथुन राशीतील बुध २०२४ नंतर खऱ्या अर्थाने गतिमान होऊन शिवसेनेचे वर्चस्व वाढीस लागेल. २०२४ लोकसभेतही उमेदवार यशस्वी होतील. यावेळी स्वतःच्या विचाराने पुढे जाणे खूप महत्त्वाचे असेल. अगदी जवळ येणारी माणसे काही वेळा घातक ठरू शकतात त्यामुळे अंतर राखून त्यांच्याकडून कामे करून घ्यावीत असेही ज्योतिष तज्ज्ञांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...