spot_img
अहमदनगरमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग केला, जन आधार सामाजिक संघटनेचा आरोप

मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग केला, जन आधार सामाजिक संघटनेचा आरोप

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत सक्षम व नियमित बांधकाम विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. त्या ठिकाणी स्व हितासाठी नेमलेल्या अवैध प्रभारी कनिष्ठ दर्जाच्या शाखा अभियंत्याच्या नेमणुकीची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, दीपक गुगळे, निलेश सातपुते, शिरीष सातपुते, शहानवाज शेख, ऋषिकेश पवार आदी उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, मागील दीड वर्षापासून जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिण या ठिकाणी कार्यकारी अभियंता या पदावर वंदेश उरांडे यांची शासनाने सक्षम व नियमित अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यांचा या नंतरही आणखी जवळपास आठ महिन्याचा कालावधी सेवानिवृत्ती होण्यासाठी बाकी आहे. परंतु मागील आठ दिवसापूर्वी अचानकपणे त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले व त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता दक्षिण पदावर प्रभारी म्हणून प्रशांत ध्रुपद या कनिष्ठ दर्जाच्या आणि वादग्रस्त शाखा अभियंत्याची निवड केली गेली.

कार्यकारी अभियंता या पदावर प्रभारी म्हणून अधिकारी नेमणूक करण्यासाठी ते पद रिक्त असूनही शासन स्तरावर नवीन अधिकारी उपलब्ध होत नसेल तर ते पद नव्याने अधिकारी नियुक्त होईपर्यंत काही ठराविक कालावधीपर्यंतच प्रभारी म्हणून सक्षम आणि समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यास देता येते. तसेच जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील समकक्ष अधिकाऱ्याचीच नेमणूक अशा पदावर करता येते ज्या अधिकाऱ्यास प्रभारी म्हणून नियुक्ती दिली जात आहे. तो यापूर्वी किमान उपअभियंता या पदावर कार्यरत असावा तसेच जिल्ह्यातील उपअभियंता सेवाश्रेष्ठता यादीमध्ये देखील अव्वल स्थानावर असावा . तसेच तो जिल्हा परिषद विभागातील इतर समकक्ष विभागांमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत असावा मात्र यावेळी कार्यकारी अभियंता दक्षिण हे पद प्रभारी म्हणून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्व-हितासाठी हे पद मर्जीतील दुय्यम अधिकाऱ्यास शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून दिल्याचे निदर्शनास येत आहे. याच मुख्य कारण म्हणजे या पदावर जिल्हा परिषद विभागातील इतर कार्यकारी अभियंत्यांना प्रभारी पद देणे गरजेचे होते.

परंतु आज कार्यकारी अभियंता दक्षिण म्हणुन प्रशांत ध्रुपद यांची नेमणूक झालेली आहे ते यापूर्वी कधीही कुठल्याही तालुक्यामध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत नव्हते. मागील काही महिन्यापूर्वीच पारनेर तालुक्यात बांधकाम विभागांमध्ये शाखा अभियंता या पदावर ते कार्यरत होते. त्यानंतर साधारण अडीच महिन्यापूर्वी त्यांची जिल्हा परिषद बांधकाम विभाग उत्तर येथे पी.ओ. (प्रकल्प अभियंता )या पदावर नेमणूक करण्यात आली. सर्व घटनेची सखोल चौकशी होऊन या घटनेस जबाबदार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Sujay vikhe patil : ‘विखे कुटुंबीयांचे योगदान जनता विसरणार नाही, विखेंनाच निवडून देतील’

राहुरी / नगर सह्याद्री Sujay vikhe patil : विखे कुटुंबीयांनी गेली तीन पिढ्यापासून जिल्ह्यासाठी...

मंदिरचा चौथरा पाडला, ग्रामस्थ आक्रमक; नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडला प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री नवनागापूरमध्ये छत्रपती नगर परिसरात आठ महिन्यापूर्वी लोकवर्गणीतून ओपन स्पेसमध्ये बांधलेले शनी...

सुजय विखेंच्या रॅलीत झळकले संदीप कोतकरांचे बोर्ड…

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कोतकर यांची भव्य बाईक रॅली अहमदनगर | नगर...

Ahmednagar crime : अतिक्रमणावरून गौरी घुमट परिसरात राडा

अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar crime : अतिक्रमण काढण्यावरून गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारीची...