spot_img
राजकारणउद्धव ठाकरे अचानक शरद पवारांच्या भेटीला ! काय सुरु आहेत पडद्यामागे हालचाली,...

उद्धव ठाकरे अचानक शरद पवारांच्या भेटीला ! काय सुरु आहेत पडद्यामागे हालचाली, पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी जाणार आहेत.

उद्धव ठाकरे दुपारी साडेचार वाजता शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीवर राज्यातील आगामी काळातील महत्त्वाच्या घडामोडी अवलंबून असण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसांत राज्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत.

त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप कसे करायचे आणि कोणाला किती जागा द्यायच्या, यावर या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कोणाला कोणती जागा द्यायची यावर अत्यंत महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या इंडिया आघाडी च्या तीन मोठ्या मॅरेथॉन बैठकाही झाल्या आहेत. पण त्यानंतर इंडिया आघाडी च्या फारशा बैठका झाल्या नाहीत. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीच्या पक्षांमध्येही तणाव आहे. इंडिया आघाडीतील पक्षांमधील संबंध ताणले गेले असले तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे संबंध मजबूत राहावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आगामी निवडणुका महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र लढणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात भेट होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद आवश्यक आहे, तो संवाद व्हावा यासाठी ठाकरे आणि पवार या दोन नेत्यांची आज भेट होत आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि प्रचार कसा करावा, याबाबत चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शरद पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले पहा…

सोलापूर / नगर सह्याद्री - Gopichand Padalkar | Sharad Pawar : ईव्हीएम मशीनच्या विरोधात...

वकिल दांम्पत्य खून प्रकरण; पाच जणांनी रचला ‘ईतक्या’ लाखांसाठी कट; साक्षीदाराने सांगितली आपबीती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲड....

बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात मोर्चा

आ. अमोल खताळ, आ.सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांची उपस्थिती  संगमनेर | नगर सह्याद्री बांगलादेशात काही महिन्यांपासून...

अहिल्यानगर: दहशत कायम! 3 बिबट्यांनी शिकार केली; शेतातील..

जामखेड | नगर सह्याद्री जामखेड शहराचे उपनगर असलेल्या भुतवडा परिसरात बिबट्यांनी गायीवर हल्ला केला असून...