spot_img
ब्रेकिंगलाकडी दांडके, कुर्‍हाडी घेत दोन गट भिडले! लहान मुलांच्या वादात असे काय...

लाकडी दांडके, कुर्‍हाडी घेत दोन गट भिडले! लहान मुलांच्या वादात असे काय घडले? नगर तालुक्यातील प्रकार..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात लहान मुलांच्या वादातून दोन गटांत लाकडी दांडके, कुर्‍हाडीने हाणामारी झाल्याची घटना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुवर्णा बाबासाहेब गव्हाणे (वय 38 रा. खंडाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोपट चंद्रभान गव्हाणे, कोमल पोपट गव्हाणे, आकाश सुरेश गिर्‍हे, कुसूम सुरेश गिर्‍हे, विकास सुरेश गिर्‍हे, सुरेश सुदाम गिर्‍हे (सर्व रा. खंडाळा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा या कुटुंबासह रविवारी रात्री घरी असताना साडेनऊच्या सुमारास पोपट गव्हाणे व इतर तेथे आले.

तु माझ्या मुलाला का मारहाण केली म्हणून त्यांनी सुवर्णाला शिवीगाळ करून मारहाण केली. घरावर दगडफेक केली. फिर्यादी, त्यांचे पती व मुले तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांना रस्त्यात आडवून लाकडी दांडके, कुर्‍हाडीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसर्‍या गटाचे पोपट चंद्रभान गव्हाणे (वय 44 रा. खंडाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक मोहन गव्हाणे व सुवर्णा दीपक गव्हाणे (दोघे रा. खंडाळा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांच्या झालेल्या वादाबाबत पोपट यांनी विचारणा केली असता दीपक व त्यांची पत्नी सुवर्णा यांनी पोपटला शिवीगाळ केली. दरम्यान, पोपट हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असताना त्यांना रस्त्यात आडवून काठी व कुर्‍हाडीच्या तुंब्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...