spot_img
ब्रेकिंग"पवार साहेब हो बोलले नंतरच राजकीय भूमिका..."; अजित पवार यांच्या वक्तव्याची राजकीय...

“पवार साहेब हो बोलले नंतरच राजकीय भूमिका…”; अजित पवार यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

spot_img

Politics News: राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती असो वा मविआ सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा होत असून बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू आहे. काल बारामतीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं, सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे.

‘शरद पवार यांना सांगूनच मी माझी राजकीय भूमिका घेतली होती’ बारामतीमधील भाषणात त्यांनी हे विधान केलं. ‘ पवार साहेब आधी हो बोलले नंतर नाही म्हणाले’ असं अजित पवार यांनी नमूद केलं. ‘ प्रत्येकाला शेवटी कुठे ना कुठे थांबावं लागतं ‘ असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरित्या पवार यांना लगावला.

बारामतीमधील डॉक्टर मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी काही विधानं केली. ‘ मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली, ती भूमिका मी साहेबांना सांगूनच घेतली. साहेब पहिल्यांदा हो बोलले, नंतर पुन्हा साहेब म्हणाले मला ते योग्य वाटत नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वातच आम्ही सगळी पुढं गेलो, ‘ असं अजित पवार म्हणाले.

‘पण हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. त्याच्यामुळे काही अडचण नव्हती . पण आता काय दोन पक्ष झाले आहेत. ‘ असं ते म्हणाले. ‘ प्रत्येकाने कुठे ना कुठे थांबावं लागतं’ असा टोला त्यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना लगावला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक होती, मी ती मान्य केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...