spot_img
अहमदनगरमांडओहोळ धरणात दोघांचा बुडून मृत्यू; 'ते' दोघेही नगरचे, असा घडला प्रकार

मांडओहोळ धरणात दोघांचा बुडून मृत्यू; ‘ते’ दोघेही नगरचे, असा घडला प्रकार

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील मांडओहोळ धरणात रविवारी (दि. १९) दुपारी दोन तरुण बुडाल्याची घटना घडली.  दोघांपैकी एकाचा मृतदेह पाण्यातून रविवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते. तर दुसर्‍या मृतदेहाचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता. अखेर सोमवार दि. २० रोजी सकाळी नऊच्या दरम्यान दुसरा मृतदेह ही सापडला. या घटनेमुळे नगरकरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नगर शहरातील नगर-कल्याण रस्ता परिसरातील शिवाजीनगर भागातील सहा मुले दुचाकीवरून मांडओहोळ जलाशयात फिरण्यासाठी गेले होते. अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १८, रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रस्ता, अहमदनगर) सौरभ नरेश मच्छा (१८, रा. अहमदनगर) हे दोन मुले मांडओहोळ जलाशयात बुडाले. प्रशासनाच्या प्रयत्नाने दोन्हीही मृतदेह आता सापडले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दुपारी अथर्व श्रीनिवास श्रीराम वय १८ वर्ष (मयत), सौरभ नरेश मच्छा वय १८ वर्ष (मयत), (चैतन्य बालाजी सापा (वय १९, शिवाजीनगर, अहमदनगर), आकाश अनिल हुंदाडे (१८), जीवन दिनेश पाटील (रा. रेल्वे स्टेशन, आगरकर मळा, अहमदनगर), अभिलाष रघुनाथ सुरम (१८) हे सहा जण दुचाकीवरून निघोज येथून मांड ओहोळ जलाशयात पोहोचले.  दुपारी तीन ते चारच्या दरम्यान अथर्व श्रीराम, सौरभ मच्छा पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. त्यानंतर इतर मित्रांनी आरडाओरड केली. आजुबाजूचे लोकही आले परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

घटनेची माहिती समजल्यावर सरपंच प्रकाश गाजरे व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. त्यांनी अथर्व श्रीरामला पाण्यातून बाहेर काढले. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सौरभ मच्छा हा पाण्यातच होता. त्याचाही शोध प्रशासनाकडून सुरू होता. सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान त्याचाही मृतदेह पाण्याच्या वर तरंगलेला दिसून आला.त्याचा शोध घेण्यासाठी नगर येथून स्वतंत्र पथक देखील बोलवण्यात आले होते. पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान प्रशासनाच्या पथकाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...