spot_img
अहमदनगरपाण्यात उतरलेल्या विजेच्या तारांचा दोन बैलांना स्पर्श, यानंतर जे घडलं ते धक्कादायक!...

पाण्यात उतरलेल्या विजेच्या तारांचा दोन बैलांना स्पर्श, यानंतर जे घडलं ते धक्कादायक! बैलगाडीमध्ये होते पती-पत्नी..

spot_img

जामखेड
शेतातील काम संपल्यानंतर बैलगाडीतून संध्याकाळी पती-पत्नी घरी परतत होते. यावेळी अचानक विद्युतपोलचा वीजप्रवाह रस्त्यावरील पाण्यात उतरला होता. याचा दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीच्या बैलांना विजेचा धक्का बसल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रसंगावधान राखून पती व पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या आपघातुन बालंबाल बचावले आहे.

गुरुवार दि २० जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारस्कर हे आपल्या पत्नीसह बैलगाडीतून शेतात गेले होते. दिवसभर शेतातील काम ओटपुन संध्याकाळी आपल्या घरी परतत होते. यावेळी पाऊस देखील सुरु होता. यावेळी बैलगाडीतून आपल्या घरी परतत असताना वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीज प्रवाह पावसाने रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरला होता.

दरम्यान बैलगाडी तेथुन जात असतानाच बैलांना विजेचा धक्का बसला. त्यामध्ये दोन्हीही बैलाचा जागीच मृत्यू झाला तर प्रसंगावधान राखून पती पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या आपघातुन बालंबाल बचावले. सदर घटनेमध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने घटनेचा पंचनामा करुन शेतकर्‍यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थानांकडून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...