spot_img
अहमदनगरश्रीरामपुराच्या राजकारणात ट्विस्ट! काँग्रेसकडून हेमंत ओगले यांना संधी

श्रीरामपुराच्या राजकारणात ट्विस्ट! काँग्रेसकडून हेमंत ओगले यांना संधी

spot_img

श्रीरामपुर । नगर सहयाद्री
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज (दि.25) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात आली असून काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या यादीत हेमंत ओगले यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघातील राखीव असलेला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक होते. काँग्रेस पक्षात अंतर्गतच दोन गट झाल्याचं दिसुन येत होत. काँग्रेसचे माजी आमदार राहीलेले दिवंगत जयंत ससाणे यांचे पुत्र आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले करण ससाणे यांनी कालच बुथ प्रमुख प्रशिक्षण शिबिरात राज्यातील प्रमुख पक्षानी श्रीरामपूर विधानसभेच्या केलेल्या सर्वेमध्ये श्रीरामपूरची जागा आपल्याच गटाला मिळणार असून कार्यकत्यांनी काळजी करु नये असे सांगितले होते. दरम्यान आज जाहीर झालेल्या काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या यादीत हेमंत ओगले यांना संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखऱ शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरिश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...