अहमदनगर। नगर सहयाद्री:-
चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने पोलिसांना तुरी देत, धूम ठोकल्याची घटना श्रीगोंदा शहरात येथे घडली आहे. समाधान हरिभाऊ मगरअसे आरोपीचे नाव असून (रा. अंभोरा ता. मंठा जि. जालना) येथील रहिवासी आहे.
अधिक माहिती अशी: श्रीगोंदा शहरातील एका दुकानात समाधान हरिभाऊ मगर (रा. अंभोरा ता. मंठा जि. जालना) हा कामाला असतांना त्यांने त्याच दुकानात चोरी केली होती. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. बुधवारी सायंकाळी सदर आरोपीला शहरातील ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी नेत असतांना त्याने पोलीसांच्या हातावर तुरी देवून बेडीसह पसार झाला आहे.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी तीन पथके आरोपीच्या शोधासाठी पाठवले असुन याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भेट देवून पोलीसांना आरोपीच्या शोधासंदर्भात सुचना केल्या आहेत.