spot_img
अहमदनगरसावेडीतील बहुचर्चित मॉडेल रोडची काळेंकडून पोल खोल; दीड वर्षात रस्ता गायब

सावेडीतील बहुचर्चित मॉडेल रोडची काळेंकडून पोल खोल; दीड वर्षात रस्ता गायब

spot_img

चार कोटींवर डल्ला | दीड वर्षात रस्ता गायब
अहमदनगर | नगर सह्याद्री

सावेडी उपनगरातील बहुचर्चित मॉडेल रोडची किरण काळे यांनी लाईव्ह पोलखोल केली. प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महल हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. अवघ्या दीड – दोन वर्षांपूव 4 कोटी खर्च करून हा मॉडेल रस्ता म्हणून विकसित केला जात असल्याचा दावा करत रस्ता केला गेला होता. मात्र जनतेच्या पैशांवर डल्ला मारला गेला असून मॉडेल रस्ता गायब झाला आहे. निकृष्ट कामामुळे जागोजागी खड्डे पडले असल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाईव्ह पोलखोल केली आहे. यावेळी त्यांनी मनपा प्रशासन, सत्ताधाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

शहराच्या लोकप्रतिनिधींकडून विश्वास जुना, आम्हीच पुन्हा असे म्हणत शहरभर पोस्टरबाजी करत सुरू असणाऱ्या जुन्या विश्वासाच्या दाव्याची शहर काँग्रेसकडून किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पोलखोल करणारा सप्ताह महात्मा गांधी जयंती निमित्त राबविला जात आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरत या मॉडेल रस्त्याची पोलखोल केली. प्रोफेसर चौकात लावलेल्या होर्डिंग खालीच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांची काळेंनी लाईव्ह पोलखोल केली. यावेळी विश्वास जुना, अनुभव जुना… रस्त्यांच्या कामात खाऊ पैसे पुन्हा पुन्हा असे फलक झळकवण्यात आले.

यावेळी परिसरात नागरिकांची मोठ्या संख्येने गद होती. यावेळी काळे यांनी महापालिका व लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले. या पोलखोल मोहिमेत मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चूडीवाला, विलास उबाळे, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, माजी नगरसेवक फैयाज केबलवाला, युवक काँग्रेसचे शम्स खान, चंद्रकांत उजागरे, आर.आर.पाटील, राहुल सावंत, ड. अजित वाडेकर, मुस्तफा खान, महिला काँग्रेसच्या उषा भगत, शैला लांडे, डॉ. जाहिदा शेख, मीनाज सय्यद, शंकर आव्हाड, सुफियान रंगरेज, गौरव घोरपडे, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे, आनंद जवंजाळ, अशोक जावळे वाढदिवसाच्या काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तत्कालीन आयुक्तांनी मलिदा लाटला
भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या मनपाच्या तत्कालीन आयुक्तांनी या मॉडेल रस्त्याच्या दुरुस्तीचा 50 लाखांचा खर्च ठेकेदाराकडून वसूल करा, कारवाई करा असे आदेश दिले होते. परंतु आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. मनपाने ठेकेदाराला काही महिन्यांपूव डागडुजी करण्याची नोटीस काढली होती. अन्यथा डिपॉझिट जप्त करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याला ठेकेदाराने केराची टोपी दाखविली आहे. ही सर्व नौटंकी सुरू असून संगनमताने सर्वसामान्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे पाप केले जात असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...