मुंबई । नगर सह्याद्री –
मेष राशी भविष्य
आयुष्याला गृहित धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण करतील परंतु तुम्ही त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा
मिथुन राशी भविष्य
तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. दिवसाची सुरवात जरी चांगली असली तरी, संद्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते.
सिंह राशी भविष्य
आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहचवते. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा.
तुळ राशी भविष्य
कामामध्ये मर्यादेपलिकडे स्वत:ला खेचू नका, योग्य ती विश्रांती घेण्याची आठवण ठेवा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल.
धनु राशी भविष्य
उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. विवाहित दांपत्यांना आज आपल्या संतानच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. अडचणीच्या प्रसंगी तुमचे कुटुंब तुमच्या बचावासाठी धावून येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. इतरांचे वागणे पाहून त्यातून तुम्हाला काही धडा शिकता येईल.
कुंभ राशी भविष्य
अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल.
वृषभ राशी भविष्य
तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाल शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील.
कर्क राशी भविष्य
तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.
कन्या राशी भविष्य
तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल परंतु, यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगारेट पासून दूर राहण्याची आवश्यकता आहे कारण, यामुळे तुमचा महत्वाचा वेळ खराब होऊ शकतो. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात, आणि आज तुम्हाला त्यांचा अनुभव येईल.
वृश्चिक राशी भविष्य
आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. कार्य क्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो म्हणून, आज तुम्हाला डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. आजच्या दिवशी तुमचा/तुमची जोडीदार क्षणार्धात तुमची दु:ख दूर करेल.
मकर राशी भविष्य
गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.
मीन राशी भविष्य
येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. पैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या.दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, कामच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर, तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही.