spot_img
महाराष्ट्रआजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 'हे' १७ मोठे निर्णय ! अहमदनगरसाठी देखील मोठे...

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ १७ मोठे निर्णय ! अहमदनगरसाठी देखील मोठे गिफ्ट, पहाच..

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : लोकसभेची आचार संहिता लागण्याआधीच आज (दि.१६ मार्च) राज्यात मोठे निर्णय घेतले गेले. आज राज्य सरकारची मंत्रीमंडळ बैठक पार पडली. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत १७ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत घेण्यात आलेले १७ निर्णय पाहुयात –

१. राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
२. तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार
३.मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
४.१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
५. संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार

६. शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
७. विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
८. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
९. हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली “मॅनहोलकडून मशीनहोल” कडे योजना

१०. संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
११. राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
१२. ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
१३. भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
१४. संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
१५. वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
१६. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर
१७. श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...