spot_img
अहमदनगरगावागावांत प्रस्थापित होऊ पाहणार्‍या दबंगगिरीतील ‘तो’ दुसरा भिडू थोपविण्यासाठी!

गावागावांत प्रस्थापित होऊ पाहणार्‍या दबंगगिरीतील ‘तो’ दुसरा भिडू थोपविण्यासाठी!

spot_img

सारिपाट / शिवाजी शिर्के
प्रस्थापीत झालेल्या गुंड आणि झुंडशाहीच्या विरोधात लिहीत आलो आणि यापुढेही त्यात बदल होणार नाही. मात्र, गरीबांचा कैवारी आणि गरीब घरातील पोरगा असा साळसुद भाबडा चेहरा म्हणून समोर येत मतदारांसमोर उभा ठाकलेला परंतू गुंड आणि झुंडशाहीला प्रोत्साहन देत गुन्हेगारीक्षेाचं उदात्तीकरण करत प्रस्थापीत होऊ पाहणार्‍या गुंडागिरीविरोधात जाहीर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. आता नाही तर कधीच नाही याचे भान आमच्या लेखणीला कायम आहे आणि ते यापुढेही राहणार आहेच!

समाज मनातील व्यथा जोरकस पणे मांडताना त्या व्यथा कमी अधिक फरकाने मीही भोगल्यात याची जाणीव मला सातत्याने होत राहते. समाजात साळसुदपणाचा, गरीब घरचा बुरखा घालून भोळा, सामान्य कुटुंबातील वाटणारा चेहरा वेगळा आणि त्याचे पडद्या आडचे भयानक वास्तव वेगळे! निर्ढावलेल्या सराईत गुंडाला लाजवेल असं काम अनेकांनी जवळून पाहिले आणि अनुभवले आहे. खरे तर काही वर्षांपूर्वी आपण मोठी चूक करतोय याची पुसटशी कल्पना देखील आली नाही. ‘आमच्या मनातील लिहिलं’, अशी प्रतिक्रिया देणारा एका मोठ्या उद्योजकाचा काल मला फोन आला.

राजकारणाशी फारसा संबंध नसणारा हा उद्योजक सुप्यातील एमआयडीसीमध्ये छोटे युनीट चालवतो. मात्र, तेथील गुंडांनी त्याला किती आणि कसे छळलेय हे सांगताना तो हंबरडा फोडून रडत होता. अशोक लांडे प्रकरणात खमकी भूमिका घेताना सोबत कोण आहेत याचा विचार केला नाही आणि त्यात निर्णायक लढाई केली. त्याचे आपण बहुतेकजण साक्षीदार आहातच! गुंड तयार होत नसतो, त्याला तयार केले जाते. गुंड जन्माला आल्यानंतर त्याच्या विरोधात बोंबलण्यापेक्षा (खरे तर लिहीण्यापेक्षा असं वाचावं; मात्र ते धाडसही अलिकडे कोणी दाखवताना दिसत नाही!) त्याचे पाय पाळण्यात दिसत असतानाच त्याला ठेचण्याची गरज असते. त्याला ठेचून काढला की त्याची पिलावळही शांत होते.

लांडे केसच्या वेळी नगरमधून बुलेट गाड्यांवरुन कानात बाळ्या घालून फिरणारे टपोरीछाप गायब झाले होते. बुलेटच्या सायलेंन्सरचे आवाज लहान झाले होते. आभाळ फाटलंय म्हणून चालणार नाही! आम्ही शिवण्याचं काम हाती घेतलंय! आता या लढाईत सहभागी व्हायचं की नाही हा आपला प्रश्न आहे. मात्र, भाबडा माणूस, साधा माणूस, गळ्यात हात घालतो, गोड बोलतो असं म्हणून जर तुम्ही निर्णय घेतला तर मग तुम्ही तुमच्या गावात जयकांत शिक्रे तयार केलाच म्हणून समजा! त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे! सुप्यात काय चालू आहे हे याचे सविस्तर वृत्त आम्ही तुम्हाला देणार आहोतच! मात्र, साळसुद चेहर्‍याच्या आड मोठं विदारक वास्तव लपलंय हे हेरण्याची गरज आहे.

पारनेरचं अख्खे पोलिस ठाणे आणि तहसील एका इशार्‍यावर चालवत पीआयला विमानात बसवून नेण्यापर्यंत हिम्मत असणारा हा अवलिया आज थोपवला नाही तर आपणच आपल्या हाताने आपल्या कुटुंबाचं, गावाचं आणि पर्यायाने परिसरातील झुंडशाहीला प्रोत्साहन देत असल्याचं पाप पोसतंय हे समजून जायचं! आता हा साधा भाबडा दिसणारा, वाटणारा राक्षस जन्माला येवू द्यायचा की त्याला त्या आधी थोपवायच याबाबत आम्ही त्याच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश करणार आहोतच! यासाठी मी माझे काम करणार आहेच! तुम्ही…?

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...